कल्याणशेट्टी दूर दूर, पास पास...

देशमुख अ‍ॅन्ड देशमुख आणि कल्याणशेट्टी या ट्रँगलचा नया दौर दिसला तर?

Sep 7, 2025 - 11:22
Sep 7, 2025 - 11:23
 0  302
कल्याणशेट्टी दूर दूर, पास पास...

(विजयकुमार पिसे)
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सचिन कल्याणशेट्टींकडे पाहिले जाते. पण त्यांची संधी हुकली. आयात पालकमंत्री मिळाला. सोलापूरकरांना ही सल व हुरहूर आहेच. होटगी मठात श्रावणमास तपोनुष्ठान समाप्तीस आ.कल्याणेट्टी आणि आ.विजयकुमार देशमुख एकत्रित होते. काशी जगद्गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला, एकत्रित काम करण्याचा सल्लाही दिला. जेव्हा धर्म आज्ञा करेल, तेव्हा त्वरेने आपण हजर राहू, असे आ. कल्याणशेट्टींचे मनोगत. आपण सदैव जगद्गुरूंच्या  सान्निध्यातच असतो, त्यांचा कृपाआशीर्वाद  नेहमीच मिळतो, असे आ. देशमुख   म्हणाले. कल्याणशेट्टी आणि देशमुख पास,पास दिसले, तेव्हा मठात उपस्थित अनेकांच्या नजरेतून ही बाब कशी सुटेल.  गौरी, गणपतीचे आगमन झाले. तसे कल्याणशेट्टी त्यांच्या मतदारसंघातच व्यस्त. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जाहीर  कार्यक्रम झाले, दौरा पार पडला. पण कल्याणशेट्टी दूर दूर का? अस्वस्थ करणारा हा सवाल पक्ष कार्यकर्त्यांना पडलाय. होटगी मठाचा करिष्मा की काशी जगद्गुरूंच्या आशीर्वादाचे फलित. अलीकडे कल्याणशेट्टी यांच्या बैठका कमी झाल्यात हे देखील तितकेच खरेय. विदर्भात पालकमंत्री बदलले गेेले, त्याची ही चाहूल की हूल? आगामी काळात देशमुख अ‍ॅन्ड देशमुख आणि कल्याणशेट्टी या ट्रँगलचा नया दौर दिसला तर?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow