उथळ पाण्याला खळखळाट फार; आरक्षणाचा गुलाल उधळला आणि...
बारामतीकर भले जाणते राजे असतील... पण नागपूरकर हे मावळे मात्र नक्कीच आहेत... छत्रपती शिवरायांच्या गादीचा मान राखणारे... संपूर्ण विश्वात महाराष्ट्राची, देशाची शान वाढवणारे स्वयंसेवक म्हणजे... देवेंद्र फडणवीस

(विजयकुमार पिसे)
आरक्षणाच्या आड मिडीयाच्या सुरातून येणारा 'अर्बन नक्षली'चा धूर.. लगाव बत्ती, देखो तमाशा.. पण त्यांना जोरदार तमाचा मारून गेला..मराठा आंदोलक गुलाल उधळत गावी परतले तेव्हा. त्याआधी हायकोर्टाचा दट्ट्या बसला. फडणवीस सरकारने अस्त्र बाहेर काढले आणि अभी नही तो कभी नही, अशा आवेशात आझाद मैदानावरील नॉनस्टॉप आंदोलनाने आवरते घेतले. आंतरवाली सराटी ते आझाद मैदान लाईव्ह कव्हरेजचे आकलन,निरीक्षण, आणि लाईव्ह सादरीकरण धडकी भरवणारे होते. मुंबईकरांचे आणि फडणवीस सरकारचे काही खरं नाही. प्रचंड गर्दीत मुंबईकरांचा संयम वाखाणणारा होता, आणि इकडे सीएम शांतपणे स्टेटमेंट देत होते. इम्बॅलन्स. इतरेजणांच्या उथळ पाण्याला खळखळाटच फार होता.
काही माध्यमं, मीडिया, चॅनेल, यू ट्यूब, सोशल मिडीया.. तसेच सकाळचे भोंगे यांची दृष्टी.. आकलन.. दृष्ट (दुष्ट) काढण्यालायक...मराठा आरक्षणासाठी वादळ धडकले, आता फडणवीस सरकारची कोंडी.. मुख्यमंत्री उदासीन ... आरक्षणाशी त्यांचे काही देणे घेणे नाही.. मुंबईत मराठ्यांचे वादळ धडकले... मनोज जरांगे यांचा एल्गार... एक ..., लाख...! जणू धडकी भरवणारे वार्तांकन, निवेदन, चित्रीकरण, यांचे 'बडे' मुद्दे रोख/ठोक वाद-विवाद, आणि उघडा डोळे... बघा नीट...असे यांचे रतीब.. सल्ले...यांना लोक,रसिक,श्रोते चांगले ओळखून आहेत. चॅनलच्या टीआरपीसाठी ठासून भरलेला मसाला... त्यांना कुणी 'प्रसन्न' होणार नाही...'कुबेर' गब्बर झालेत... हे सारं चालवलं जातंय बारामती, मातोश्रीवरील बिछडे हुए त्या दोन बंधूंसाठी... कधी कधी हा आवाज शेट्टींचाच 'शिट्टी' वाजवतो... जिथे गोड होणार आहे, तिथे 'कडू' प्रहार करणार! ...अर्बनगिरीची वाढलेली जामात. इव्हीएम हॅक सांगणार... आणि महत्व पटवून देणार बीस साल बाद पूर्वीच्या बॅलेट पेपरचे... तेव्हाच्या काँग्रेसी बूथ कॅप्चर स्टोर्या ही जामात कधीच नाही सांगणार..पण व्होट चोरीच्या शिरजोरीचा अगदी 24 तास भोंगा वाजवत राहणार..
कधी कधी यांच्या सुरातून येणारा अर्बन सूर.. लगाव बत्ती, देखो तमाशा.. पण त्यांना जोरदार तमाचा मारून गेला..यांचे पवार प्रेम तर इतके उफाळून यायचे, सांगता सोय नाही...! त्यांना मराठा आंदोलकांनीच आझाद मैदानावर जरांगे भेटीस आल्यानंतर जोरदार चपराक लगावली... म्हणजेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी जाणता राजा... हे अधोरेखित केले.
आंदोलकांनी त्या दिवशी बारामती खासदार ताईच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकून काकान्वर राग व्यक्त केला. हा धडधडीत पुरावा...
नुसतेच बोलंभाट नकोत, कुणालाही उगीचच चॉकलेट दिले अशी "दादा"गिरी ही नकोय. ज्यामुळे हे देवाभाऊचे भाट, प्रवक्ते असावेत. त्यांची आरक्षण उपसमितीच रद्द करून, तिथे कसलेले राजकारणी विखे पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करून फडणवीस 'सेफ' झाले. शिवाय विखे पाटलांना परंपरागत पाण्यात पाहणारे बारामतीकर काकासाहेब आणि प्रवरानगरकर विखे यांच्या शत्रुत्वात फडणवीसानी काकांना चितपट केले. छत्रपतींचा वारसा सातारा..! कोल्हापूर नव्हे...शिवेंद्र राजे भोसले यांची तिथे उपस्थिती. त्यांचे विषयी जरांगे यांचे जाहीर उद्गार, आदर आणि विश्वास.. याचा अर्थ राज्यसभेवर गेलेले माजी खासदार राजे असो वा कोल्हापूर लोकसभेचे विद्यमान खासदार राजे यांच्या पेक्षा अधिक विश्वासार्हता सातारा गादीचे नामदार शिवेंद्रराजेच होत.
अर्थात देवाभाऊ महाराष्ट्राच्या राजकारणातील बापमाणूस... सर्वांना पुरून उरलेला हे या आंदोलनातून अधोरेखित झाले. बारामतीकर भले जाणते राजे असतील... पण हे नागपूरकर मावळे नक्कीच आहेत... छत्रपतींच्या गादीचा मान राखणारे... संपूर्ण विश्वात महाराष्ट्राची, देशाची शान वाढवणारे स्वयंसेवक....देवेंद्र फडणवीस...
What's Your Reaction?






