दादांचा डाव, पालकमंत्र्यांवर घाव...

चंद्रकांतदादा अस्सल कोल्हापुरी राजकारणी, सुई न टोचताही काटा काढण्याचा डाव...

Sep 7, 2025 - 11:11
 0  254
दादांचा डाव, पालकमंत्र्यांवर घाव...

(विजयकुमार पिसे)
भाजपात सध्या नया दौर सुरू आहे. त्यामुळेे जाणते नेते व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. पण देवाभाऊ आहेत हुश्यार! त्यांनी सोलापूरच्या राजकारणाचा पोत अचूक़ ओळखला. गणपती दर्शनाच्या निमित्ताने माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सोलापुरी दर्शन देऊन गेले. त्यांचा दौरा सर्वस्पर्शी झाला. जाता जाता  पालकमंत्र्यांच्या मर्यादाही. प्रशांत परिचारक, सुभाषबापू देशमुख, विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, रोहिणी तडवळकर, मोहन डांगरे यांच्या निवासी गणरायाचे दर्शन घेतले. शिवाय शहरातील मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या मंडपातही जाऊन आले. गेल्या आठवड्यात भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. संजय सावकारे ऐवजी पंकज भोयर यांच्या हाती सूत्रे दिली. त्यामुळे सोलापुरातही पालकमंत्री बदलाचा डाव आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
 कारण विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे गटातटाच्या राजकारणात अडकले आहेत. दोन देशमुख त्यांना दाद देत नाहीत, पण त्यांच्याशिवाय गोरे पान हलवतात. ही दरी अजूनही कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर पालकमंत्री गोरेंना पक्षात समन्वय साधता येत नसेल तर ते पक्षासाठी हानीकारक ठरेल. सोलापूरच्या दौर्‍यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर महापालिका दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे महापौर भाजपाचाच हवाय, असे निक्षून सांगितले.
 सोलापूर शहरात पालकमंत्र्यांचे कार्यक्रम,बैठक़ा,दौरे  शहर मध्य मतदारसंघातच होतात. पक्ष कार्यालय, महापालिका, सरकारी कार्यालय आणि तेथील नियोजन बैठक, प्राणीसंग्रहालय याच मतदारसंघात. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांच्या मर्यादा स्पष्ट होत होतात, (अलीकडे.. पक्षात नको असलेले यांचेशी संपर्क, सलगी सुरू आहेत. पण..) ही कोंडी फोडण्यासाठी चंद्रकांत दादा आले की परस्पर  गटातटाच्या सर्व नेत्यांच्या घरी जाऊन आले. पालकमंत्र्यांची दमदार कामगिरी शहर मध्यमधील त्यांचे समर्थकच सोशल मिडियावर व्हायरल करतात. पक्षातील इनकमिंगसाठीची खटपट देखील एक हातीच. स्थानिक आमदार,  नेते व पदाधिकारी यांना विश्‍वासात न घेताच निर्णय? त्यांना हेतुत: दुखवायचे आणि श्रेय आपल्याकडे घेण्याचा हेतू असावा. राहिला प्रश्‍न दिलीप माने, हसापुरे, कोल्हे, काळे यांच्यासह अनेकांच्या पक्ष प्रवेशाचा. पक्षाला जड होणारे नेतृत्व लादायचा पालकमंत्री गोरे यांचा डाव. दादा अस्सल कोल्हापुरी राजकारणी, सुई न टोचताही काटा काढण्याचा डाव टाकला. कुणावर वर्मी घाव बसतोय..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow