काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह यांचा राजीनामा, हसापुरेंना संधी!

मोहिते पाटलांचे लक्ष्य; सुशीलकुमार व खा.प्रणितीताई, काँग्रेसची अवस्था पवार आणि ठाकरे गटासारखी होईल!!

Dec 11, 2024 - 10:39
 0  45
काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह यांचा राजीनामा, हसापुरेंना संधी!

(विजयकुमार पिसे)

करमाळ्यात बिबट्याचा बंदुकीने अचूक वेध घेतल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी लागलेले अकलूजचे डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आता शिंदे परिवारालाच लक्ष्य करून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्ह्यात "शिंदे परिवाराची काँग्रेस" अशीच ओळख राहिली तर भविष्यात पक्षाची अवस्था शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे होईल. याकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान धवलसिंह यांचा राजीनामा पक्षाच्या पथ्यावर पडणार असून "सुंठीवाचून खोकला गेला", अशी भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पदावर शिंदे गटाचे सुरेश हसापुरे यांची वर्णी लागेल, अशीही चर्चा आहे. 

   चार वर्षापूर्वी धवलसिंह यांनी अचूक निशाणा साधून बिबट्याला ढेर केले. या घटनेनंतर काही दिवसांनी 2021 मध्ये त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची संधी चालून आली. त्यांची कारकिर्द नेहमीच चर्चेत राहिली. आणि एककल्ली कारभार अशी प्रतिमा होती. त्यामुळे या काळात ग्रामीण काँग्रेस वार्‍यावर अशीच अवस्था होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची अनपेक्षित भेट घेतल्यामुळे चर्चेत आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील पुन्हा सक्रिय झाले. आणि यावेळी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. मात्र याचे खापर त्यांनी सुशीलकुमार आणि खा.प्रणितीताई यांच्यावरच फोडले आहे. त्यांच्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. तो आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सहा पानी पत्रातून स्पष्ट केले आहे.

सुशीलकुमार दोनवेळा पराभूत झालेल्या मतदारसंघातून प्रणितीताई लोकसभेत निवडून आल्या. दक्षिण सोलापूऱ आपला मतदारसंघ असताना तिथे अपक्षाला पाठिंबा, सांगोलेत शेकापचा प्रचार त्यामुळे काँग्रेसच आघाडीचा धर्म पाळत नाही, म्हणून आपले उमेदवार नरोटे (यांच्या प्रभागात ताई मायनस), तरीही उमेदवारी व दक्षिणेत पाठिंबा दिलले अपक्ष धर्मराज काडादी यांनाही अनामत गमवावी लागली. काडादी यांचा प्रचार सुरेश हसापुरे व हरिश पाटील यांनी प्रचार केला. शिवाय काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. अकलूजच्या मोहिते पाटलांचा उल्लेख, "जिच्यासाठी वेगळी चूल मांडली, तीच सासू वाटणीला". याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. पंढरपुरात भगीरथ भालके पक्षात सक्रिय नसताना उमेदवारी दिली. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. दक्षिण सोलापुरात आपण स्वत: इच्छुक होतो. तिथेही पक्षाचे काही चालू दिले नाही. शिंदे सांगतील तीच पूर्वदिशा असेल तर काँग्रेसची अवस्था शरद पवार आणि ठाकरे गटासारखी होईल, असे धवलसिंह म्हणाले.

तर हसापुरे होतील अध्यक्ष

धवलसिंह मोहिते पाटील अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द प्रभावी ठरली नाही. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी जबाबदारीने लोकसभा निवडणूक यंत्रणा हाताळली. ज्यामुळे प्रणितीताई विजयी झाल्या. ही वस्तुस्थिती पाहता धवलसिंह यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षाच्या रिक्त पदावर सुरेश हसापुरे यांची वर्णी लागू शकेल. हसापुरे हे शिंदे परिवाराचे विश्‍वासू अशी ओळख आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow