आ.देशमुखद्वय, आ.कल्याणशेट्टी, आ.कोठे यांनी घेतली शपथ

देवेंद्र कोठे यांचा हटके शपथ, तात्यांचे स्मरण, फडणवीसांवर श्रध्दा

Dec 9, 2024 - 18:25
 0  330
आ.देशमुखद्वय, आ.कल्याणशेट्टी, आ.कोठे यांनी घेतली शपथ

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील निवडून आलेले भाजपा सदस्य आ. सुभाषबापू व आ.विजयकुमार देशमुखद्वय, आ.सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. विजयकुमार, सचिनदादा आणि देवेंद्र दादा यांनी शपथ घेताना आपल्या आईचेही नाव घेतले. कोठे यांनी हटके शपथ घेतली. आजोबा स्व.तात्या कोठे यांचे स्मरण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांनी श्रध्दा व्यक्त केली. 

 कालपासून दोन दिवस 288 विधानसभा मतदार संघातील निर्वाचित सदस्यांचा शपथ विधी सोहळा विधानभवनात सुरू आहे. आ. सुभाष देशमुख यांनी यंदा दक्षिण सोलापुरातून हॅटट्रिक केली आहे. त्यांनी सुभाष सुरेशचंद्र देशमुख असे नाव घेतले. अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी आई सुरेखा पंचप्पा कल्याणशेट्टी असे नाव घेतले. आणि वंदेमातरम असा शेवटी उल्लेख केला. पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम विजय देशमुख यांचा आहे. त्यांनी आई लिलावती सिद्रामप्पा देशमुख असा उल्लेख शपथ घेताना केला.  

शहर मध्य मतदारसंघात प्रथमच भाजपाचा झेंडा फडकवलेले देवेंद्र कोठे यांनी प्रभू श्रीराम, श्री स्वामी समर्थ, पांडुरंग, ग्रामदैवत सिध्दरामेश्‍वर, कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुष यांना सर्वप्रथम वंदन केले. आजोबा स्व.तात्या कोठे यांना स्मरण केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर श्रध्दा ठेवून मी देवेंद्र सुहासिनी राजेश कोठे असा उच्चार केला. आणि सरतेशेवटी गोमाता आणि भारतमाता यांनाही वंदन केले.

दरम्यान 288 पैकी 280 सदस्यांनी रविवारपर्यत आमदारकीची शपथ घेतली आहे. माळशिरसचे आ. उत्तम जानकर यांनी मारकडवाडी बॅलेट प्रकरणावरून शपथ घेतली नाही. मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका जाहीर केली असली तरी सोमवारी ते शपथ घेतील, असे दिसते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow