हिंदू संमेलने, ग्रामीण भागात मंडल स्तरावर पथसंचलने

रा.स्व.संघ शताब्दी वर्ष: 2 ऑक्टो.दसर्‍यापासून प्रारंभ; गृह संवाद, संपर्क, पंच परिवर्तन केंद्रित कार्यक्रमातून सकल हिंदू समाज एकवटणार!*संघाच्या व्यापक समन्वय बैठकीत नियोजन

Sep 9, 2025 - 20:04
 0  221
हिंदू संमेलने, ग्रामीण भागात मंडल स्तरावर पथसंचलने

(विजयकुमार पिसे)

सकल हिंदू समाजाचे विशाल प्रकटीकरण, त्यासाठी पंच परिवर्तन केंद्रित कार्यक्रम रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षात होणार आहेत. येत्या 2 ऑक्टोबर विजयादशमी दसर्‍यापासून शस्त्रपूजन आणि संचलन सोलापूर शहरातील 16 नगर आणि 57 ग्रामीण मंडल स्तरापर्यंत नियोजित केले आहेत. त्या अनुषंगाने रविवारी टाकळीकर मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हा रा.स्व.संघाची व्यापक समन्वय बैठक पार पडली.     

    प.महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री.दिलीपराव क्षीरसागर, पुणे विभाग प्रचारक श्री.मंगेश जी बडवे, जिल्हा संघचालक श्री.सुनील इंगळे, शहर संघचालक श्री.राजेंद्र काटवे, जिल्हा कार्यवाह श्री.ह्रषीकेश कुलकर्णी, यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाच्या व्यापक समन्वय बैठकीस संघ परिवारातील 31 जनसंघटना व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

     सकल हिंदू समाजाचे प्रारूप विकसित करून हिंदू जीवनविचारांचा आधार भक्कम करण्यासाठी सकल हिंदू समाजाचा सहभाग वाढला पाहिजे. पंच परिवर्तन केंद्रित कार्यक्रम आणि उपक्रम केंद्र स्तरापासून ग्रामीण भागातील मंडल स्तरापर्यंत होणार आहेत. विजया दशमी दसरा शस्त्रपूजन आणि संघाच्या पथसंचलनात समाजातील सर्व घटकांना आमंत्रित केले जाणार आहे. येत्या 2ऑक्टोबरपासून संघशताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. संघ शताब्दी वर्षामध्ये डिसेंबरमध्ये गृहसंवाद अभियान, जानेवारी आणि फेब्रुवारीत सर्वत्र व्यापक हिंदू संमेलने होतील. पंच परिवर्तन बिंदूंवर समन्वय बैठकीत नियोजनावर गटनिहाय चर्चा झाली. यावेळी श्री.क्षीरसागर आणि श्री.बडवे यांनी मार्गदर्शन केले. 

   व्यापक समन्वय बैठकीचे जिल्हा सहकार्यवाह शिवानंद गंजी, संजीव सिध्दूल, शहर कार्यवाह शिवानंद कल्लूरकर, सहकार्यवाह प्रवीण चिक्कळी यांनी यशस्वी नियोजन केले.

      *पंचपरिवर्तनाचे बिंदू...*

 कुटुंब प्रबोधन, समरसतापूर्ण व्यवहार, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरिक शिष्टाचार आणि "स्व"-बोध या पंच परिवर्तन बिंदूंवर कार्य केले जाणार आहे. यासाठी समाजातील सज्जन शक्तींना सोबत घ्यायचे आहे. संघाची यापूर्वीची आंदोलने, चलवली, अभियान, कार्यक्रम, उपक्रमाची यशस्वीता झाली आहे, याची काही उदाहरणे देऊन श्री.दिलीप क्षीरसागर यांनी संघ शताब्दी वर्ष देखील यशस्वी होईल, असा विश्‍वास मनोगतातून व्यक्त केला........

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow