जिंकले सीपीआर, इंडी आघाडीची मते फुटली!
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे राधाकृष्णन यांचा धमाका एनडीएकडे 427 मते, मिळाली 452, विरोधकांची 14 मते खेचली
(विजयकुमार पिसे)
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन तथा सीपीआर यांनी धमाका उडवून दिला. खमक्या इंडी आघाडीची 14 मते फुटली. त्यामुळे सुदर्शन रेड्डी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे. सीपीआर यांना 452 तर रेड्डी यांना 300 मते मिळाली. एनडीएकडे 427 मते होती,शिवाय वायएसआरची11 मते मिळाली. क्रॉस व्होटींगची फेक चर्चा.
विजयी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते आणि पराभूत जस्टीस रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली. रेड्डी आंध्र,तेलंगणाचे. पण तेथेच फाटाफूट झाली. या निवडणुकीत 767 खासदारांनी मतदान केले. यापैकी 15 खासदारांची मते अवैध ठरली. इंडिया आघाडीची 14 पेक्षा अधिक मते फुटली, असा प्राथमिक अंदाज आहे. देशाचे नवनिर्वाचित 15 वे उपराष्ट्रपती महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.
एनडीएला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असल्याने सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित होता. पण इंडी आघाडी खमक्या आहे, त्यामुळे एनडीएचीच मते फुटतील, असा विरोधकांचा नॅरेटिव्ह होता. पण विरोधकांची मते एकसंध राखली गेली नाहीत. क्रॉस व्होटिंगमुळे राधाकृष्णन यांचं मताधिक्क्य घटणार अशीही चर्चा होती. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून एनडीएचे एकूण 427 खासदार आहेत. जगममोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्या पक्षाचे दोन्ही सभागृहात 11 खासदार आहेत. त्यांची मते गृहित धरली तर एनडीएचा आकडा 438 होतो. पण राधाकृष्णन यांना 452 मते मिळालीत. त्यामुळे विरोधकांची 14 मते फुटली, अशी प्राथमिक माहिती आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली.
What's Your Reaction?