राहुलजींच्या फेक नॅरेटिव्हचे पोस्टमार्टेम; सुप्रीम कोर्टाने त्यांच्या भारतीयत्वाविषयी घेतली शंका, म्हणाले: तुम्ही असं बोललाच नसता!

राहुलजींच्या फेक नॅरेटिव्हचे पोस्टमार्टेम; सुप्रीम कोर्टाने त्यांच्या भारतीयत्वाविषयी घेतली शंका, म्हणाले: तुम्ही असं बोललाच नसता!

Aug 5, 2025 - 11:17
 0  413
राहुलजींच्या फेक नॅरेटिव्हचे पोस्टमार्टेम; सुप्रीम कोर्टाने त्यांच्या भारतीयत्वाविषयी घेतली शंका, म्हणाले: तुम्ही असं बोललाच नसता!

 (विजयकुमार पिसे)
ऐकीव माहितीच्या आधारे वक्तव्य करणारे राहुलजींच्या असत्य नॅरेटिव्हची सुप्रीम कोर्टात चिरफाड झाली.  राहुलसह, सिंघवींचीही कानउघाडणी करताना संसदेत बोला ना; सोशल मिडियावर का? असा सवाल केला. न्यायमूर्ती म्हणाले की, तुम्हाला (गांधी) कसे कळले की 2000 चौरस कि.मी. भारतीय भूभाग चीनच्या ताब्यात आहे? तुम्ही तिथे होता का? तुमच्याकडे काही विश्‍वासार्ह माहिती आहे का? तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय ही विधाने का करता? असा प्रहार करत त्यांना दाखवला.
     राहुल गांधी आणि फेक नॅरेटिव्ह असे समीकरणच आहे. ऐकीव माहिती, माध्यमात आलेली माहिती याची खातरजमा न करताच लोकांमध्ये देशाच्या सुरक्षेविषयी संभ्रम निर्माण करण्याचा राहुलजींचा डाव आज उघडा पडला.  भर कोर्टात न्यायमूर्तींनी राहुल गांधी आणि त्यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना  कानपिचक्या दिल्या. देशाचा जबाबदार विरोधी पक्षनेता कसा नसावा, याविषयीचा वस्तुपाठच अधोेरेखित झाला.
     2022 मध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या दरम्यान त्यांनी भारत चीन संघर्षाचा हवाला देत 2000 चौरस किलोमीटर भारतीय भूभाग चीनने  व्यापला आहे. तसेच 20 भारतीय सैनिकांना मारहाण करून त्यांना मारण्यात आले, असे वादग्रस्त विधान केले होते. वास्तविक विरोधी पक्षनेते म्हणून संसदेत हा मुद्दा उपस्थित करणे शक्य होते. पण त्यांनी सोशल मिडियाचा वापर केला.  जनतेत संभ्रम करणारा हा फेक नॅरेटिव्ह आहे. त्यामुळे आज सोमवारी 4 ऑगस्ट रोजी न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. ऑगस्टीन मसीह यांच्या खंडपीठाने खडसावले. तुम्हाला कसे कळते की चीनने भारताची जमीन बळकावली आहे. जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे बोलणार नाही. बीआरओचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी गांधींवर मानहानीची तक्रार दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केली. तसेच युक्तिवाद करणारे त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचीही उलटतपासणी घेतली. अ‍ॅड.सिंघवी म्हणाले की, विरोधी पक्षनेते असे मुद्दे उपस्थित करू शकत नसेल तर ती दुर्दैवी परिस्थिती असेल. वृत्तपत्रांत छापलेल्या गोष्टीही बोलता येत नसतील तर विरोधी पक्षनेते असू शकत नाहीत. यावर न्या.दत्ता म्हणाले, तुम्ही संसदेत जे काही बोलायचे आहे ते तेथेच का बोलत नाही? तुम्हाला हे समाज माध्यमांवरून का बोलावे लागते? तुमच्याकडे काही विश्‍वासार्ह माहिती आहे का? तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय ही विधाने का करता.
राहुल यांची शैली आणि माफीनामा.  प्रणितींचे तमाशा विधान....
1.राहुल गांधी आणि वाद असे समीकरणच आहे. पण ज्यामुळे अनेक प्रकरणात राहुल गांधी आणि काँग्रेस तोंडघशी पडली आहे. संघ परिवार, सावरकरांचा माफीनामा, हिंदुत्व, मोदी हे त्यांचे लक्ष्य आहे. खाकी हाफपॅन्ट, लाठी काठी, शाखा हे  21 व्या शतकातील कौरव असे राहुलनी संबोधले होते. यावर हरिद्वार न्यायालयात खटला प्रलंबित आहे.2.स्वा.सावरकर यांनी इंग्रजांकडे माफीनामा मागितला होता. आणि आजही गांधी यावर ठाम आहेत. सावरकरांच्या नातवांनी राहुलना कोर्टात खेचले आहे.3.लोकसभा (2019) निवडणुकीत कोलार येथे प्रचारसभेत मोदी चोरांचे सरदार आहेत. असे विधान करताना ललित मोदी,नीरव मोदी यांचेशी नरेंद्र मोदींची तुलना केली. तेव्हा पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला.  सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सदस्यत्व अपात्र घोषित करण्यात आले होते.4. गौरी लंकेश हत्येत संघ विचाराचा हात आहे, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर संघस्वयंसेवक अ‍ॅड.ध्रृतीमन जोशी यांनी ठाणे कोर्टात त्यांच्यावर खटला भरला.5.काळे धनविषयी (2018) अमित शाह यांच्यावर टिपणी केली. यात अहमदाबाद न्यायालयाने त्यांना जामीनावर सोडले. भिवंडी येथील प्रचार सभेत (2014) म.गांधींची हत्या संघाच्या लोकांनी केली, या वादग्रस्त विधानावर संघस्वयंसेवक राजेश कुंटे यांनी खटला भरला. तेव्हा सुप्रीम कोर्टात राहुलनी माफी मागितली. याशिवाय विदेशात गेल्यानंतर भारताविरोधी प्रपोगंडा. पाक, चीन विषयी अनुकूल विधाने हे नित्याचेच झाले. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरमधून शत्रू राष्ट्रांना भारतविरोधी खाद्य पुरवले. यात भर पडली खा.प्रणिती शिंदे यांची. त्यांनी ऑपरेशन सिंधूर एक तमाशा असे वादग्रस्त विधान करून जवानांच्या शौर्याचा अपमान केला. राहुल गांधी यांच्या शैलीचे प्रणितीताई यांनीही अनुकरण केले. संसदेत आणि वाराणसी येथील सभेत प्रधानमंत्री मोदी यांनी प्रणिती यान्च्या विधानाचा समाचार घेत "तमाशा"वर  जोरदार "तमाचा" मारला. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow