संत रविदासजींची ६५०वी आणि अशोक जी सिंघल जन्मशताब्दी वर्षानिमित्त विहिंप १ कोटी हितचिंतक बनविणार

नवी दिल्लीत विहिंप केंद्रीय प्रबंध समिती बैठकीत राष्ट्रीय व सामाजिक विषयांवर प्रस्ताव. काही न्यायालयीन निर्णयांमुळे पारंपरिक सुदृढ कुटुंब व्यवस्थेला धक्का, स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती हत्याकांड आयोगाच्या अहवालावर चिंता...संत रविदासजींचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी देशभर विविध कार्यक्रम

Jul 20, 2026 - 23:55
 0  6
संत रविदासजींची ६५०वी आणि अशोक जी सिंघल जन्मशताब्दी वर्षानिमित्त विहिंप १ कोटी हितचिंतक बनविणार

 नवी दिल्ली : विश्‍व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रबंध समितीची दोन दिवसीय बैठक १९ व २० जुलै रोजी छतरपूर, नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत संत रविदासजींची ६५०वी जन्मशताब्दी आणि श्रद्धेय अशोक जी सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुढील वर्षभरात देशभर विविध कार्यक्रम तसेच संघटनात्मक विस्तारावर विशेष भर देेण्याचा निर्णय झाला. विशेषत: जन्मशताब्दी वर्षानिमित्त विहिंप १ कोटी हितचिंतक बनविणार आहे. तसेच समकालीन राष्ट्रीय व सामाजिक विषयांवर महत्वाचे प्रस्तावही यावेळी पारित करण्यात आले.
     देशभरातील केंद्रीय पदाधिकारी व प्रबंध समितीच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती या बैठक़ीस होती. यावेळी खालील प्रस्ताव पारित झाले. 1) कुटुंबव्यवस्था मजबूत करण्याबाबतचा प्रस्ताव : केंद्रीय बैठकीमध्ये भारतीय समाजाची मूलभूत शक्ती असलेल्या कुटुंबव्यवस्थेचे संरक्षण व सुदृढीकरण करण्यावर भर देण्यात आला. प्रस्तावात म्हटले आहे की, भारतीय कुटुंबव्यवस्थेने शतकानुशतके समाजाला संस्कारित, संघटित व आत्मीय ठेवण्याचे कार्य केले आहे. सध्याच्या काळातील आव्हानांवर समाज व शासन या दोन्ही स्तरांवर गंभीरपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.  **काही न्यायालयीन निर्णयांमुळे पारंपरिक सुदृढ कुटुंब व्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. विवाहबाह्य संबंधांना मान्यता, लिव्ह-इन रिलेशनशिपला वैधानिक मान्यता, समलैंगिकतेला मान्यता इत्यादी विषयांवर व्यापक चर्चा घडवून आणून, कुटुंबव्यवस्थेची हानी रोखण्यासाठी कायदे करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.  **त्या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदू परिषदेने कुटुंब प्रबोधन तसेच कौटुंबिक मूल्यांच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय यावेळी घेतला. 


    2) स्वामी लक्ष्मणानंद सरस्वतीजींच्या हत्येच्या चौकशी आयोगाच्या अहवालाबाबत चिंता  करण्यात आली.  पूज्य स्वामी लक्ष्मणानंद सरस्वतीजींची कंधमाल (ओडिशा) येथे झालेल्या निर्घृण हत्येच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचा अहवाल गायब होणे आणि तो सार्वजनिक न करण्यात येणे, याबाबत विहिंपच्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.  
     केंद्रीय प्रबंध समितीने **या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सी.बी.आय.मार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयातील सत्य जनतेसमोर आणणे हे न्याय व जनविश्‍वासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे परिषदेने म्हटले आहे. **ओडिशामध्ये मतांतरावर(धर्मांतरण) पूर्णपणे प्रतिबंध घालण्याचे आवाहन करण्यात आले.  
   3) संत रविदासजींच्या ६५०व्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष वक्तव्य : संत शिरोमणी गुरु रविदासजींच्या ६५०व्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष प्रस्ताव पारित करण्यात आला. विश्‍व हिंदू परिषदेने म्हटले आहे की, **संत रविदासजींनी दिलेला सामाजिक समरसता, समानता, आध्यात्मिक चेतना व मानवी प्रतिष्ठेचा संदेश आजही संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणादायी आहे.  संत रविदासजींचे संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प परिषदेने केला आहे. 
    4) श्रद्धेय अशोक सिंघलजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष योजना यावेळी आखण्यात आली. दिनांक २७ सप्टेंबर२०२६ रोजी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते श्रद्धेय अशोक जी सिंघल यांची जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर हिंदू समाजासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यात येईल. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात विश्‍व हिंदू परिषद संघटनात्मक विस्तारावर विशेष लक्ष केंद्रित करेल.  अशोक सिंघलजींनी राम मंदिर आंदोलनाला मजबूत नेतृत्व दिले. हिंदू जागरण अभियान राबविले आणि सामाजिक समरसतेला प्रोत्साहन दिले. गोआधारित शेतीच्या माध्यमातून गोसंरक्षण व गोसंवर्धनाचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या पुनर्स्थापनेचे केंद्र म्हणून वेद विद्यालये विकसित करण्यात येतील.  
   अशोक जी  सिंघल यांनी विश्‍व हिंदू परिषदेला एक शक्तिशाली संघटना म्हणून स्थापित केले. त्यांच्या दूरदर्शी विचारांनी व अथक प्रयत्नांनी हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १ कोटी हितचिंतक बनविण्याचा संकल्प करण्यात आला.  बैठकीचा समारोप हिंदू समाजाला संघटित करण्याचा, सनातन मूल्यांचे संरक्षण करण्याचा तसेच राष्ट्रहिताच्या कार्यात सक्रिय भूमिका निभावण्याचा दृढ संकल्प करून करण्यात आला.
जय श्रीराम!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow