अखंड भारत, स्वातंत्र्य दिन व पुण्यश्लोक साम्राज्य संस्था वर्धापननिमित्त रक्तदान

अखंड भारत संकल्प दिन, स्वातंत्र्य दिन आणि पुण्यश्लोक साम्राज्य वर्धापनदिनानिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, पुण्यश्लोक साम्राज्य संस्था व श्रीराम नवमी समितीच्या वतीने होटगी रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारत माता पूजन व वंदे मातरम्‌ने सुरुवात झालेल्या या शिबिरात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मान्यवरांनी फाळणी, स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले.

Aug 16, 2026 - 23:41
 0  1
अखंड भारत,  स्वातंत्र्य दिन व पुण्यश्लोक साम्राज्य संस्था वर्धापननिमित्त रक्तदान

सोलापूर : १४ ऑगस्ट अखंड भारत संकल्प दिन व स्वातंत्र्य दिन तसेच पुण्यश्लोक साम्राज्य वर्धापनदिनानिमित्त १५ रोजी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
   रक्तदान शिबिराची सुरुवात भारत माता पूजन, वंदे मातरमने करण्यात आली. यावेळी ४८ दात्यानी रक्तदानात योगदान दिले. 
 जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत व प्रभाग 25 चे नगरसेवक वैभव जी हत्तुरे व गुरुकृपा क्लिनिकचे डॉ. राजकुमार पाटील व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. 14 ऑगस्ट भारताची फाळणी कशी, याविषयावर अ‍ॅड. राजपूत यानी मनोगत मांडले. भारत स्वातंत्र दिनानिमित्त नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी माहिती दिली. व जयदेव सुरवसे व्यसनमुक्ती या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते महेश आठवले व नितीन भोपळे, कल्पनाताई जगदाळे याप्रसंगी उपस्थित होते.
  विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुण्यश्लोक साम्राज्य संस्था श्रीराम नवमी समिती होटगी रोड यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीर हनुमान प्रखंडाचे मंत्री सुरज मोरे श्रीराम नवमी समितीचे अध्यक्ष ऋषिकेश ताटे व पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, विहिंप दक्षिण सोलापूर प्रखंड सहमंत्री अजय गवसने, दीपक जळके  आनंद डांगे, अप्पू कांबळे, श्रीकांत धुमाळ, ओमकार कोरे यांचीही उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow