अक्कलकोटमध्ये १६ फुटी प्रभू श्रीराम मूर्तीचा संकल्प

अक्कलकोट शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेसाठी प्रभू श्रीरामांची कायमस्वरूपी १६ फूट उंचीची भव्य मूर्ती आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी १५ ऑगस्टपासून शहरातील प्रत्येक घरातून लोकवर्गणी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. व्यापारी, नागरिक, भाविक आणि श्रीराम भक्तांनी इच्छेनुसार योगदान देऊन या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

Aug 16, 2026 - 23:44
 0  3
अक्कलकोटमध्ये १६ फुटी प्रभू श्रीराम मूर्तीचा संकल्प

अक्कलकोट : अक्कलकोट शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेसाठी कायमस्वरूपी भव्य १६ फूट उंचीची प्रभू श्रीरामांची मूर्ती आणण्याचा संकल्प श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आला आहे.या उपक्रमासाठी  १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून अक्कलकोटमध्ये  प्रत्येक घरातून लोकवर्गणी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे.
   या लोकवर्गणी अभियानात शहरातील व्यापारी, नागरिक, भाविक तसेच प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी आपल्या इच्छेनुसार सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन समितीच्या वतीने केले आहे. प्रभू श्रीरामांची ही मूर्ती केवळ एका वर्षासाठी नसून दरवर्षीच्या श्रीराम जन्मोत्सवाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रभू श्रीरामांच्या या मूर्तीचे स्थान अखंडित व कायमस्वरूपी राहणार आहे. अक्कलकोटच्या प्रभू श्रीराम भक्तांची श्रद्धा, सहभाग आणि एकतेचे प्रतीक म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.  श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, हा केवळ मूर्ती आणण्याचा उपक्रम नसून अक्कलकोट मधील प्रत्येक रामभक्ताच्या सहभागातून साकार होणारा सामूहिक श्रद्धेचा उपक्रम आहे. शहरातील प्रत्येक घराचा या कार्यात सहभाग असावा आणि प्रत्येक नागरिकाला या उपक्रमात योगदान असावे, या उद्देशाने दिनांक 15 ऑगस्ट पासून लोकवर्गणी अभियान राबविण्यात येणार आहे.
    प्रत्येकाने आपल्या परीने दिलेले योगदान हे या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमातील आपला सहभाग दर्शविणारे असेल. त्यामुळे अक्कलकोट शहरातील नागरिक, व्यापारी बांधव, दानशूर व्यक्ती आणि सर्व श्रीराम भक्तांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद व सहयोग देऊन सहकार्य करावे. या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायची इच्छा आहे, त्या श्रीराम भक्तांनी श्रीराम जन्मोत्सव समितीशी संपर्क करावा. ऋषीकेश लोणारी, संपर्क क्र. 9822102327, राहुल वाडे,  संपर्क क्र. 9130271305 यावर संपर्क साधावा असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने केले आहे.  
  यावेळी अक्कलकोट श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी ऋषिकेश लोणारी, राहुल वाडे, संतोष वगाले, सौरभ हळके, प्रथमेश पवार, तम्मा मामा शेळके, प्रसन्न गवंडी, शिवशंकर स्वामी, गुरु माळी, धनराज पाटील, अजय साखरे, देविदास गवंडी, मदन राठोड, सुनील पाटील, संदीप कटकधोंड, सागर राठोड, श्रीशैल जकापुरे, महेश धोंगडे, आकाश गडकरी, शिवशरण इचगे, सिद्धाराम लाळशेरी, सिद्धाराम मंगरुळे, पिंटू हिंडोळे, दयानंद रोडगे, गोविंद शिंदे, निशांत निंबाळकर, श्रीधर गुरव, समर्थ आडवितोटे, आकाश बाळीकाई, विजय लांडगे, रामेश्‍वर स्वामी, देविदास गवंडी, सचिन पवार इत्यादी उपस्थित होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow