भाजपाच्या यशाचे कौतुक आम्हासाठी गौरवाचा क्षण : महापौर कोंड्याल
सोलापूर महापालिका व जिल्ह्यात भाजपाला मिळालेल्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक करणार असून हा कार्यकर्त्यांसाठी गौरवाचा क्षण असल्याची भावना महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केली. विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
सोलापूर : भारतीय जनता पार्टीला सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांमध्येही मिळालेल्या भरघोस यशाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी हा गौरवाचा क्षण आहे, या शब्दात महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात येत आहेत, या पृष्ठभूमीवर आ.देवेंद्र कोठे यांचेसमवेत ह.दे.प्रशालेच्या मैदानावर तयारीची पाहणी केली. आजच्या विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी 12 वाजता होणार्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
सोलापूरकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सोलापूरकरांसोबत आहोत, सोलापूरकरांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. विकास कामे, पायाभूत सुविधा, नियमित स्वच्छ पाणी पुरवठा हा संकल्प आम्ही केला आहे. याबाबतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोलापूरवर विशेष प्रेम आहे, त्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, विकासाच्या सोहळ्याचे साक्षीदार होउ या, अशा भावना आ.देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केल्या आहेत. विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शहर-जिल्हावासियांनी उपस्थित रहावे आणि विकासाच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे नमूद केले आहे.मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सभेसाठी 100 बाय 300 फुटांचे तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. वाढत्या उन्हामुळे खबरदारी म्हणून विशेष मंडप, भव्य शामियाना उभारला आहे. तसेच 100 मोठे कुलर, 4 टन क्षमतेची 6 वातानुकूलित यंत्रणा आहे.
What's Your Reaction?