दोन गोतस्कर तडीपार
दोन गोतस्कर तडीपार, विहिंपच्या मागणीची 24 तासात प्रशासनाकडून दखल, कुरेशी बापलेकांवर दोन जिल्ह्यांमधून तडीपारची पोलीस कारवाई

(विजयकुमार पिसे)
सरकारच्या गोवंश हत्या बंदी कायदाविरोधात आणि विहिंप बजरंग दलाच्या गोसंरक्षण आणि गोसंवर्धन विरोधी भूमिका घेऊन जमितअतुल कुरेशी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून 7 ऑगस्ट रोजी सोलापुरात मोर्चा काढणार आहे. यासंदर्भात शासन, प्रशासन आणि पोलीस खात्याला सतर्कतेबाबत मागणी करणारे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने पोलीस व प्रशासन यांना दिले होतेे. त्याची तातडीने दखल घेतली. आणि अवैधपणे गोवंश तस्करी, वाहतूक आणि गोवंश जनावरांच्या कत्तली व सामाजिक तेढ निर्माण करीत असल्याबद्दल काँग्रसचे माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी आणि त्यांचा मुलगा अलीम कुरेशी यांना सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यांमधून तडीपारची कारवाई आज केली आहे.
अवैधपणे गोवंश तस्करी, वाहतूक, हत्या,कत्तली तसेच गोरक्षकांवर हल्ले या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने 4 मार्च 2015 रोजी गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. त्यानंतरही अवैध आणि छुप्या मार्गाने हा उपद्रव राज्यभरात सुरू आहे. या विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेत या अवैध व्यावसायिकांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. यापार्श्वभूमीवर ऑल इंडिया जमीयतुल कुरेश अॅक्शन कमिटीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान शरद पवार काँग्रेसचे समर्थक शास्त्रीनगर भागातील माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी (वय 52) अलीम इब्राहिम कुरेशी (वय35) यांच्याविरोधात सन 2009,2015,2016,2018,2021,व 2025 या कालावधीत टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा, मारामारी करणे, जनावरांची निर्दयपणे व क्रुरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे, गोवंश जातीय जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. तसेच गोवंश जातीय जनावरांच्या कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण आदी गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यामुळे सदर बझार पोलीस ठाण्याकडून म.पो.का.1951 कलम 55 अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोलापूर यांना दिला होता. या प्रस्तावानुसार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी तातडीने आदेश क्र.2012/2025 अन्वये कार्यवाही केली.
दरम्यान पशुपालक व कुरेशी समाजाचा व्यवसाय बंद पडला आहे, अशी तक्रार इंडिया जमीयतुल कुरेश अॅक्शन अॅक्शन कमिटीने केली आहे. कुरेशी समाज पशुधन खरेदी, विक्री व मटन व्यवसायाशी संबंधित आहे. पशुधन खरेदी विक्रीवर बंदी घातल्यामुळे शेतकर्यांपुढे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच पशुखाद्य, प्रक्रिया उद्योग,चर्मोद्योग,लघुउद्योग, सौंदर्यप्रसाधने सर्जरी उद्योग अडचणीत सापडल्याचा दावा या कमिटीने केला आहे. पण पशुधनाची अवैध वाहतूक, हत्यामुळे पशूधन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, ही वस्तुस्थिती विश्व हिंदू परिषदने निदर्शनास आणून देत त्यांचे संघटित प्रयत्न जारी असे निदर्शनास आणून दिले. दरम्यान यासंदर्भात केंद्र सरकारने 13 एप्रिल 2017 रोजी पशुक्रुरता अधिनियम सुधारणा कायदा लागू केला. केंद्र व राज्य सरकारच्या गोवंश विषयी कायद्यांची सोलापूर जिल्हा व परिसरात कठोर अंमलबजावणी केल्यामुळे कुरेशी व्यावसयिक हतबल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आंदोलन व बंद पुकारला आहे. तसेच 3 ऑगस्ट रोजी सोलापुरात या व्यावसायिकांची बैठक झाली, तीमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कायद्यावर आक्षेप घेतला आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षक यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याकडे शासन व पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून घेत त्यांना विहिंपने निवेदन दिले. याची दखल घेतली. सोलापूर जिल्हा विहिंप व बजरंग दलाच्या वतीने दिलेल्या निवेदनाप्रसंगी जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू डोंगरे महाराज, जिल्हा मंत्री संजय जमादार, प्रांत धर्माचार्य सहप्रमुख नागनाथ बोंगरगे, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे (पत्रकार), मानद पशूधन कल्याण अधिकारी महेश भंडारी, बजरंग दल संयोजक सिद्राम चरकुपल्ली, प्रांत विशेष संपर्क विभागाचे पुरुषोत्तम उडता, गोरक्षक आदित्य चिप्पा, वीरू मंचाल उपस्थित होते.
What's Your Reaction?






