पूरग्रस्तांच्या संकटात विहिंप धावून आली
हत्तूर,कुलकर्णी तांडा,सिंदखेड, राजूर, बिरनाळ,चंद्रहाळ, वडकबाळ येथे फूड पाकिटे वाटप
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, अक्कलकोट या भागातील अनेक गावं बाधित झाली आहेत. विहिंप सोलापूर जिल्ह्यातर्फे सीना नदी काठच्या वडकबाळ, होनमुर्गी,हत्तूर,राजूर,बिरनाळ,संजवाड,कुलकर्णी तांडा, सिंदखेड, चंद्रहाळ, आहेरवाडी येथील बाधितांना फूड पाकिटे वाटप केली. याशिवाय वडकबाळ येथे 92 गोवंशांची पुरातून सुटका करून त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत हलवण्यात आले आहे. तसेच गोवंशाना चारा,भुस्सा, गुळाची सोय गोसंरक्षकानी केली आहे.
सीनेच्या पुराने अनेक गावे बाधित झाली आहेत. बरेच कुटुंब काबिल्यासह वाड्या, वस्त्यांवर आहेत. तिथे मदत पोहोचणे दुरापास्त झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन विहिंपने बाधितांच्या वाड्या वस्त्यांवर मदत पोहोचविण्याचा निर्णय घेतला. गावातील काही कुटुंब मंदिर, शाळा येथे वास्तव्यास आले आहेत. तिथेही विहिंपच्या योजनेतून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. समर्थ फौंडेशन, जीवन चाबुकस्वार, चंद्रशेखर पाटील, गोरक्षक रोहित बंडगर तसेच पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेचे अप्पू कांबळे आणि श्री रामनवमी समिती होटगी रोड येथील संयोजक जयदेव सुरवसे आणि व्हीएलआरचे अजय गवसने यांच्या योजनेतून फूड पाकिटांची व्यवस्था करण्यात आली.
पूरग्रस्तांच्या मदत कार्यात विहिंप जिल्हा मंत्री संजय जमादार, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, धर्मप्रसार प्रमुख जयदेव सुरवसे, बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्राम चरकूपल्ली, सहसंयोजक अभय कुलथे, गोरक्षा सहप्रमुख अविनाश कैय्यावाले, धर्मप्रसार टोळी सदस्य अनिल कोळी, सेवा विभाग सहप्रमुख राजेश यनगंटी, विशेष संपर्क प्रमुख प्रवीण जिल्ला, नैतिक मूल्य शिक्षण प्रमुख चन्नबसवेश्वर सोलापुरे, बेंबळकर, चंद्रशेखर पाटील, अजय गवसने व त्यांची टीम मदत कार्यात सहभागी झाली आहे.
तसेच या पुरामुळे रस्त्यावरती अडकून पडलेल्या गाडी चालकांसाठी जय हिंद फूड बँक यांचे कडून भोजन व्यवस्था पुरवण्यात आली होती. यासाठी ही विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला होता.
What's Your Reaction?