एनसीपी नेत्यांना हवंय कमळ चिन्ह! कमळाची इतकी लोकप्रियता की...?
...पण निवडणूक आयोगाची हटवादी भूमिका, म्हणे हे चिन्ह?

(विजयकुमार पिसे)
सदस्य संख्येत कोटींची उडान घेतलेल्या कमळाची इतकी लोकप्रियता आहे की, एनसीपी नेत्यांना त्यांच्या पक्षावर भरवंसा राहिला नाय. त्यामुळे कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पण निवडणूक आयोगाच्या हटवादी भूमिकेने एनसीपी नेतेही इर्रेला पेटले आहेत. पाहू या पुढे काय होतंय ते..।
दरम्यान निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलं नाही तर निवडणुका होऊच देणार नाही, अशी टोकाची भूमिका या पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे निवडणूक़ घेण्याविषयी संभ्रम निर्माण झाला असून हा पेच कसा सुटेल, याविषयी उत्सुकता वाढली आहे.
शेजारच्या बांगलात सरकार उलथवून टाकण्याचा प्रक़ार गेल्यावर्षी झाला आणि प्रधानमंत्री शेख हसीना यांना देशातून पलायन करावे लागले. आता तिथे पुढील वर्षी फेब्रुवारीत निवडणुका होऊ घातल्या आहेत. आणि देशात क्रांती घडवणारा हा पक्ष आहे नॅशनल सिटीझन पार्टी (एनसीपी). विद्यार्थ्यांची संघटना म्हणून हा पक्ष ओळखला जातो. त्यांना राष्ट्रीय निवडणूक लढवणे आहे. यासाठी पक्षाचे निवडणूक चिन्ह "शिप्ला" म्हणजे "कमळ" हेच असावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संघटनेने गतवर्षी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार उलथवून टाकले होते. त्यामुळे हे आक्रमक आहेत. दरम्यान कमळ हेे बांगलादेशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. त्याची मोठी लोकप्रियता आहे. ती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने गोठवले आहे, असा आरोप एनसीपी नेत्यांनी केला आहे.
"शिप्ला" निवडणूक चिन्ह का दिले जाणार नाही, याचा एक तर्क आहे. प्राप्त माहितीनुसार शिप्ला" कमल हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीतील 115 चिन्हांमध्ये नाही. त्यामुळेच "शिप्ला" चिन्ह "एनसीपी"ला देता येत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एनसीपीने कमळ चिन्ह मिळाले नाही तर निवडणुका कशा होतात आणि सत्ता कशी स्थापन केली जाते, अशी धमकीच दिली आहे.
What's Your Reaction?






