आहेतच चार? होणार ७५ पार!!
आहेतच चार? होणार ७५ पार!!
(विजयकुमार पिसे)
चारसौ पार! लोकसभा निवडणुकीत पुढे काय झाले? यापासून बोध घेण्याची आवश्यकता आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपा पाठोपाठ अजीतदादांच्या राष्ट्रवादीनेही ७५ पार नारा दिलाय. बहुमतासाठी *52 पत्ते पुरेसे आहेत. *७५ पार" मुळे इच्छुकांना हत्तीचे बळ येते. प्रमुख नेते कार्यकर्त्यांना बळ येण्यासाठी असा नारा देतात. पण चारसौ पार चा *नारा, *वारा कसा फिरतो हे लक्षात घेतला नाही तर? जमिनीवर *(ग्राउंड लेव्हलवर काम करतो) जो असतो, तो अशा घोषणा देत नसतो. राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरचा चार्ज घेताच ७५ पार घोषणा दिली. महायुतीची चर्चा होण्यापूर्वीच अशी घोषणा म्हणजे स्वतंत्र लढण्याची तयारी. भाजपा,शिंदे सेनेसाठी हा मेसेज. अण्णा बनसोडेंच्या कानात कुणीतरी कुजबजले असावेत. आवाका लक्षात न घेताच त्यांनी भीमटोला लगावला. प्रत्यक्षात सर्व १०२ ठिकाणी उमेदवार मिळतील का? याचा अभ्यास प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आहे? शेवटी १०२ची बेरीच गाठण्यासाठी ज्या इच्छुकांना पक्षाने संधी दिली नाही, असे ऐनवेळचे *गेटकेन सापडतील. *पवार साहेबांच्या पक्ष प्रमुखानी पदभार घेताच असाच उत्साह दाखवला. त्यांनी उमेदवार शोध मोहीम काही प्रभागांमध्ये सुरू केलीय. तीन महिन्यापूर्वी पुण्यातील विभागीय आढावा बैठकीत एका भाजपाच्या *उत्साही नेत्याने सांगितले, सोलापुरात आम्ही 75 पार करणार! तपशीलाने माहिती घेतली तेव्हा एका "बाप" नेत्याने ग्राउंड लेव्हल लक्षात आणून दिली. असो. राहिला प्रश्न देशमुख मालकांसोबतचा व्हायरल सेल्फी. इथेच सारा खेळ*खंडोबा" आहे. बनसोडे अण्णांच्या (कदाचित) नंतर लक्षात येईल.
What's Your Reaction?