कोण म्हणतंय मुस्लिमांना तिकीट नाही..
कोण म्हणतंय मुस्लिमांना तिकीट नाही..
(विजयकुमार पिसे)
भाजपा मुस्लिमांचा तिरस्कार करतो, अन्याय करतो, ही नेहमीचीच टीका. अगदी दुर्बिण लावून पाहतात.किती मुस्लिमांना उमेदवारी दिलीय. अक्कलकोट न.प. निवडणुकीत भाजपाने मुस्लिमांना मुक्तहस्ते तिकीट दिले आहे. त्यामुळे हे उदा.नेहमीसाठीच सांगता येईल. अक्कलकोट शहरात मुस्लिमांचा प्रभाव लक्षात घेता आ.कल्याणशेट्टी यांनी तब्बल पाच मुस्लिमांना संधी दिली आहे. *प्र.3अ मुस्तफा मदारसाब गवंडी,*3ब रेश्मा मुबारक शेेख,*7अ नावेद म.रफीक डांगे,*9ब सद्दाम हुसेन नूरअहमद शेरीकर,*12क अल्फीया फैजअहमद कोरबु. यामध्येही दोन महिला मुस्लिम आहेत. त्यामुळे समान न्याय असाही संदेश दिला आहे. यामध्ये शेरीकर हे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे त्यांना तिकीट आणि भाजपा प्रवेश साथ साथ. शेरीकर यांच्या अन्य उपक्रमाविषयी हिंदुत्ववाद्यांनी काही विचारू नये बरं? अक्कलकोटमध्ये हिंदुत्वाची ताकद मोठी आहे, नेहमीच भाजपाच्या पाठिशी असतेच, हे गृहितच धरले असावे. यासाठी राहुल वाडे आणि प्रसन्न गवंडी हे इच्छुक होते म्हणे. बहुदा दोघे तितके प्रभावी नसावेत, म्हणजे निवडून येण्याचा निकष नाही. अर्थात कमी उपद्रवमूल्य. एकमात्र नक्की झाले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार मीलनदादांचे नक्कीच *कल्याण" होणार। दगाफटका नको म्हणून मुस्लिम नेत्यांची फौज देखील अक्कलकोट,दुधनी,मैंदगी न.प. निवडणूक प्रचारात झोकून दिली आहे. लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना सगळेच मुस्लिम तेव्हा अस्पृश्य होते. कडवे हिंदुत्वनिष्ठ सातपुते आता या भागाचे निवडणूक प्रभारी. त्यांच्यासाठी *राम/रहिम" एकच. भाजपाच्या दोन दादांचा *राम/रहिम" पॅटर्न पक्षश्रेष्ठींनी सगळीकडे सांगायला हरकत नसावी.
What's Your Reaction?