आक्रमक नेते उमेश पाटील अजीतदादा गटाचे जिल्हाध्यक्ष
आक्रमक नेते उमेश पाटील अजीतदादा गटाचे जिल्हाध्यक्ष

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नरखेडचे उमेश पाटील यांची निवड झाली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारले.
संतोष पाटील अजीतदादा दीपक साळुंखे हे विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. सोबत घेऊन जाणारे उमेश पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ अजित पवार यांनी घातली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील हे सुद्धा पक्षावर नाराज होते. त्यांनी तशी नाराजी व्यक्त करून दाखवली. शरदचंद्र पवार गटात जाण्याची शक्यता त्यावेळेस वर्तवली गेली. मात्र आपला नेता अजित पवार हेच मानून त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता केवळ यशवंत माने यांचा पराभव करण्यासाठी दंड थोपटले होते आणि अजित पवारांना दिलेल्या शब्दानुसार त्यांनी मोहोळमध्ये यशवंत माने यांचा पराभव केला. त्यानंतर ते पुन्हा अजित पवारांच्या जवळ गेले.
दरम्यान अजितदादांनी सुद्धा उमेश पाटलांचे दिलेल्या शब्दाला जागणारा कार्यकर्ता म्हणून कौतुक केले.उमेश पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्याने आता सोलापूर जिल्ह्याचे राजकीय समीकरणे निश्चित बदलतील.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात आक्रमक व अभ्यासू चेहरा अशी त्यांची ओळख आहे.
What's Your Reaction?






