टीव्ही केंद्रावर हल्ला, अँकर शो सोडून पळाले

इस्त्रायलच्या बॉम्ब हल्ल्याची भयावह भीषणता, इराणमध्ये टीव्ही प्रसारण ठप्प' स्टुडिओवर हल्ला, टीव्ही अँकर लाईव्ह कार्यक्रम करत होती. ती शो सोडून पळाली

Jun 17, 2025 - 00:49
 0  433
टीव्ही केंद्रावर हल्ला, अँकर शो सोडून पळाले

इस्रायल, इराण युध्द निर्णायक वळणार आले असून भीषण भयावह हल्ले, मालमत्तेची प्रचंड नासधूस आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. इस्रायलने इराणच्या सरकारी टीव्ही केंद्राववर हल्ला केला. हा हल्ला लाईव्ह शो कार्यक्रमाच्या दरम्यान घडला. तेव्हा जीवाच्या भीतीने अँकर पळून गेले. टीव्हीचे प्रसारण थांबले. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू येतो. स्टुडिओमध्ये धूर आणि धूळ पसरली. त्यामुळे अँकर आणि क्रू मेंबर्सना कॅमेरा सोडून बाहेर पळावे लागले.
     दरम्यान इस्रायलने या भीषण हल्ल्याच्या आधी तेहरानमधील लोकांना इशारा दिला होता. टीव्ही केंद्राचा स्टुडिओ ज्या भागात आहे, तो भाग रिकामा करण्यास सांगितले होते. सोमवारी इराणने इस्रायलवर मिसाइल आणि ड्रोनने हल्ला केला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले. इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजू लागले. हल्ल्यात आठ नागरिक मारले गेले आणि अनेक जखमी झाले, असा दावा केला आहे.
    इस्रायल इराणवर आणखी हल्ले करणार आहे. इस्रायलच्या सैन्याने तेहरानमधील काही भागांतील लोकांना घरे सोडण्यास सांगितले आहे. इराणने सोमवारी सकाळी इस्रायलवर मिसाईलने हल्ला केला तेव्हा  त्यात पाच लोक मारले गेले. इस्रायलने दावा केला आहे की, त्यांनी तेहरानवर हवाई क्षेत्रात नियंत्रण मिळवले आहे. ते कोणत्याही धोक्याशिवाय इराणच्या राजधानीवरून उड्डाण करू शकतात. त्यात आज त्यांनी हल्ला केला आहे. तसेच 120 इराणी मिसाईल  त्यांनी नष्ट केले.
    युद्धाच्या चौथ्या दिवशी, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी इराणमधील 120 पेक्षा जास्त जमिनीवरून मारा करणारी मिसाईल लाँचर्स नष्ट केली. हे इराणच्या एकूण मिसाईल लाँचरच्या एक तृतीयांश आहे. लढाऊ विमानांनी तेहरानमधील कुद्स फोर्सच्या 10 कमांड सेंटर्सवर हल्ला केला. कुद्स फोर्स ही इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डची खास शाखा आहे. ही संघटना इराणबाहेर लष्करी आणि गुप्तचर ऑपरेशन्स करते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे. इस्रायलने इराणच्या वैज्ञानिकालाही ठार केले. इराणने इस्रायलची एअर डिफेंस सिस्टीम भेदली होती. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow