शाळेचा पहिलाच दिवस, विद्यार्थ्यांना दिले 'आशीर्वाद'। विवेकानंद विद्यालयात प्रभातफेरी
देगाव पीएम श्री योजनेतील शाळेत जिल्हाधिकार्यांचा संवाद व फोटो, सुनीलनगरच्या कोंड्याल शाळेत प्रभातफेरी, पुस्तक व खाऊ वाटप

सोमवारी16 जून नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस, विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक, प्रभातफेरी,पुस्तक,गणवेश वाटप आणि तोंड गोड करण्याचा कार्यक्रम जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे देगाव येथील जि.प. शाळेत स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी बच्चेकंपनीशी संवाद साधला, आणि चक्क जमिनीवर बसून विद्यार्थ्यांसमवेत फोटो काढले. तसेच एमआयडीसी सुनील नगर भागातील विवेकानंद विद्यालय येथेही विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत झाले.
देगाव येथे जमिनीवर बसून जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आज विद्यार्थांचे स्वागत केले. आशिर्वाद यांनी जमिनीवर बसून विद्यार्थ्यांसमवेत छायाचित्र काढले. तसेच सर्वाशी हितगुज, संवाद साधला. त्यामुळे प्रेमाने विद्यार्थी भारावून गेले. या प्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार यांनी जमिनीवर बसून लहान विद्यार्थ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत प्रेमाची प्रचिती दिली. उच्च पदावर राहून देखील आपल्या मनाचा मोठेपणा त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. देगावची जि.प. शाळा पीएम श्री योजनेअंतर्गत आहे.
एमआयडीसी सुनील नगर भागात आज विवेकानंद विद्यालय येथे शाळेचा पहिला उत्साहात पार पडला. आजच्या दिवसानिमित्त शाळेमध्ये सकाळी विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रभात फेरी काढली आणि मुलांचे फुल देऊन स्वागत केले. शाळेच्या संचालिका सौ. धनश्री कोंड्याल, तसेच सौ. गोली मॅडम यांनी मुलांना पुस्तके वाटप केली. शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. सुतार मॅडम आणि धनश्री कोंड्याल मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. तसेच खाऊ वाटप केला. याप्रसंगी शाळासमितीच्या अध्यक्षा जानकी मस्के तसेच शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. कष्टकरी वर्गातील ही शाळा कोंड्याल शाळा म्हणून ओळखली जाते. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, नगरसेवक विनायक कोंड्याल आणि आ.देवेंद्र कोठे यांचे या शाळेस मार्गदर्शन असते. त्यांनी शाळेच्या लौकीकात आणि गुणवत्तेत भर घातली आहे.
What's Your Reaction?






