समर्थांच्या नगरीत लॅण्ड जिहादचा कट, निमित्त पायवाट, हेतू बसस्थानकात अतिक्रमण व घुसखोरी
शिवसेनेचे परिवहनमंत्री सरनाईकांचा असाही 'प्रताप', अन् म्हेत्रेंचे हिंदूहितऐवजी मुस्लिम तुष्टीकरण! अतिक्रमण, घुसखोरी आणि महिलांची सुरक्षा धोक्यात; 19 रोजी सकल हिंदू समाजाचा अक्कलकोटमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

(विजयकुमार पिसे)
स्वामी समर्थ यांचे भक्तांना वचन, भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. समर्थांंची अक्कलकोट नगरी भयभीतनगरी करण्याचा खटाटोप म्हणा की कट, आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रक़ार म्हणजे बसस्थानकातून पायवाट सुरू करणे. आणि ही पायवाट म्हणजे लॅण्ड जिहादचा कट? एक़दा पायवाट सुरू झाली की मग त्याला फाटे फुटणार, हक्काचा रस्ता झाला. आणि पुढे जागा बळकावणे, अतिक्रमण करणे, नागरिक व महिलांची सुरक्षा धोक्यात. पुण्यात स्वारगेट प्रक़रण ताजे आहे. आणि राज्याचे परिवहनमंत्री या पायवाटीस अनुकूल असतील तर येथेही भविष्यात स्वारगेट झाले तर जबाबदार कोण? विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी गृहमंत्री सिध्दाराम म्हेत्रे जे अलीकडेच हिंदुत्व विचाराच्या शिवसेनेत जाऊन हातात भगवा धरला आहे. त्यांनीच या पायवाटसाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाने येत्या 19 जूनला हिंदू जनआक्रोश मोर्चाची हाक तमाम अक्कलकोटवासीयांना दिली आहे.
बसस्थानक शेजारी नागरिकांच्या जा, ये साठी केलेला मोठ्ठा सिमेंट रस्ता.
स्वामी समर्थांमुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. चौपदरी रस्ते झालेत. जुने बसस्थानक गेले, नवे भव्य दिव्य बसस्थानक साकारले जात आहे. अक्कलकोटच्या या विकासरथात भाजपा सरकारची मोठी भूमिका आहे. पण शिंदे सेना विकासात हातभार लावणार की हिंदूहित विरोधात जाऊन मुस्लिम तुष्टीकरण करणार हा कळीचा प्रश्न आहे. पंधरवड्यापूर्वी काँग्रेसचे माजी गृहमंत्री आणि आमदार सिध्दाराम म्हेत्रे, त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे काँग्रेस सोडून हातात भगवा घेत शिवसेनेत प्रवेश केला. आणि त्यांचा पहिलाच कार्यक्रम म्हणजे विकासाला ब्रेक लावणे. नव्याने होणार्या बसस्थानक परिसरात आधीच अतिक्रमण होते, बांधकामात खबरदारी म्हणून संरक्षक भिंत बांधली, नागरिकांच्या जा, ये साठी बसस्थानकाशेजारी सिमेंट रस्ताही केला. पण या भागातील जिहादी तत्वाची काही मंडळी सक्रिय झाली.
शिवसेना नेते सिध्दाराम म्हेत्रे यांनी बसस्थानकातून पायवाट सुरू करण्यासाठी पुढाकार घेत संबंधितांचे उपोषण सोडवले. शिवाय सोलापूऱ दौर्यावर आलेले परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचीही भेट घेतली. जुनी पायवाट चालू करून देण्याची मागणी केली, मंत्र्यांनी ती तात्काळ मान्यही केली. आणि संबंधित विभागाला दूरध्वनीवरून संपर्क साधला व पायवाट चालू करण्याचे आदेशही दिले. लोकांची गैरसोय होते हे निमित्त आहे. पण बस्थानकात गैरकाम, बेकायदा व्यवसाय, अवैध उपक्रम झाले. अतिक्रमण झाले अणि स्वारगेटसारख्या घटनेची भीती सकल हिंदू समाजाने व्यक्त केली आहे. त्यामुळे 19 जून रोजी सकल हिंदू समाजाने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा दिली आहे.
सकल हिंदू समाजाने उपस्थित केलेले प्रश्न...
पायवाट कशासाठी? आणि कोणाच्या फायद्यासाठी? पायवाटसाठी आताच अट्टाहास का. वहिवाटीची पायवाट म्हटली जाते, पण नक्की वहिवाट कोणाची आणि कशी. एसटी स्टँडच्या जागेमध्ये कोणाची वहिवाट कशी होऊ शकते. स्टँडच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम व अवैध धंदे करणार्यांना का हवाय हा रस्ता मोकळा. या परिसरामध्ये लुटमारीचे प्रकार होतात, वहिवाट झाली तर प्रवाशांच्या सुरक्षेचे काय. वहिवाट झाल्यानंतर स्वारगेटसारखी घटना घडल्यास जबाबदार कोण?
What's Your Reaction?






