बीडमधील उपसरपंचाची कारमध्ये डेडबॉडी, डोक्यात गोळी लागली, हत्या की आत्महत्या
बार्शी तालुक्यात सासुरे येथे बेवारस कार आढळली, तमाशाच्या नादाला लागून आयुष्याचा झाला शेवट

संवेदनशील बीड जिल्ह्यातील गेवराई जवळील लुखा मसलाचे तरुण उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 38) यांचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या एका कारमध्ये आढळला. हत्या की आत्महत्या, हा सस्पेन्स आहे. तमाशाच्या नादाला लागून जीवनाचा शेवट झाला, अशी चर्चा आहे.
ही धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे उघडकीस आली आहे. सदर उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत उपसरपंच गोविंद बर्गे गेवराई तालुक्यातील दैठणचे रहिवासी आहेत. प्लॉटिंगच्या व्यवसायातून चांगला पैसा कमवला, या दरम्यान पारगावच्या तमाशातील नर्तिका पूजा गायकवाडशी संपर्क आला. पुढे जवळीक वाढली आणि प्रेमात रूपांतर झाले. अर्थात गोविंदने दागदागिने दिले. शिवाय सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल भेट दिला, अशी माहिती आहे. पण या प्रेमात ट्वीस्ट झालं, त्या समेटासाठी गोविंद बर्गे बार्शी तालुक्यातील सासुरे येथे आला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काळ्या रंगाची कार या परिसरात संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आली. तेव्हा वैराग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना गोविंग बर्गे मृत अवस्थेत सापडला. बंदुकीने डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
What's Your Reaction?






