इअर टॅगिंग नसेल तर जनावरे जप्त, थेट गोशाळेत रवानगी
सोलापुरातील मोकाट जनावर नियंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन सक्रिय, मनपा आयुक्तांची सुसंवाद बैठक,गोपालक,विहिंप,रा.स्व.संघ प्रतिनिधींची उपस्थिती

सोलापूर : सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरत असून, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत गोपालकांसमवेत सुसंवाद बैठक़ घेतली. इअर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरे आढळली तर कायमस्वरूपी जप्त करून ती गोशाळेत ठेवण्यात येईल, असा इशारा दिला. त्यामुळे इअर टॅगिंग अनिवार्य करा, तसेच आपणास गोसंवर्धन करायचे आहे, यासाठी गोपालक व गोसंवर्धक यांनीही सहकार्य करावे, असे सांगितले.
मनपात आयोजित बैठकीस विविध संस्था, संघटना व गोपालक समाजाचे प्रतिनिधी आमंत्रित होते. श्री.तपन डंके (नियंत्रण अधिकारी मनपा), शिवाजी राऊत (व.पो.नि.),सतीश दावणे (स.पो.नि.),पत्रकार किरण बनसोडे, संपादक तथा विहिंप विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे,रा.स्व.संघाचे राहुल पावले, संगमेश्वर शरणार्थी, मानद पशुकल्याण अधिकारी (मुंबई हायकोर्ट) महेश भंडारी, देविदास मेटकरी, मनोज सोलसे, लखन अंजीखाने, संतोष गायकवाड, श्रीकांत देडे, शिवबा शहापूरकर,श्री.तोडकर(मंडई विभाग), महादेव शेरखाने (कोंडवाडा विभाग) उपस्थित होते.
*असे आहेत कारवाईचे नियम: इअर टॅगिंग असलेली जनावरे पहिल्यांदा मोकाट आढळल्यास : मोठे जनावर 10,000 दंड, लहान जनावर 5,000 दंड.दुसर्यांदा मोकाट आढळल्यास : मोठे जनावर 20,000 दंड, लहान जनावर 10,000 दंड.पुन्हा मोकाट आढळल्यास : जनावर कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत जमा.
*महेश भंडारी म्हणाले की, तिसर्यांदा जनावर मोकाट आढळल्यास संबंधित जनावर मालकांवर पशु क्रूरता अधिनियम 1976 कलम 11/1 प्रमाणे गुन्हा दाखल करावा.जेणेकरून गोपालकावर जबाबदारी निश्चित होईल. *रा.स्व.संघाचे राहुल पावले म्हणाले, शहरामधील गोपालक गोवंश मालक संख्या व जनावरे यांची माहिती संकलन,करावी,लंपीग्रस्त गोवंश जनावरांचे कॉरंटाईन, वाढते शहरीकरण,रस्ते,वाहने, मोकाट जनावरांसाठी सीमावर्ती भागात गायरान जागा, गोवंश पांजरपोळ, गोशाळेत पशुवैद्यकीय डॉक्टरची आठवड्यातून दोन वेळा भेटी. व तपासणी
अॅड.मनीष गडदे यांच्या त्या पत्राने वेधले लक्ष
विजापूर रोड भागातील सजग नागरिक अॅड.मनीष गडदे यांनी 22 ऑगस्ट 2025 रोजी मनपाकडे तक्रार नोंदविली होती.त्याची दखल अद्याप न घेतल्याने त्यांनी सदरचा तक्रारी अर्ज व्हायरल केला होता. त्यांच्या या पत्राचेही लक्ष्यवेध न्यूजच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.
What's Your Reaction?






