बृहन्मठ होटगी संस्थेतर्फे पूरबाधितांना साहित्य वाटप व आरोग्य तपासणी
बृहन्मठ होटगी संस्थेतर्फे पूरबाधितांना साहित्य वाटप व आरोग्य तपासणी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर, सिंदखेड, संजवाड आदी गावातील पूरग्रस्तांना श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने ब्लँकेट, साडी,लहान मुलांचे कपडे, संसारोपयोगी साहित्य, पाणी, जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
आ.विजयकुमार देशमुख, बाळासाहेब शेळके,संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक तथा माजी नगरसेवक शिवानंद पाटील, बसवराज केंनाळकर, नरेंद्र काळे, सरपंच राजेंद्र कुलकर्णी, राजशेखर भरले, रावसाहेब व्हनमाने, प्रशांत सलगरे, रोहित पाटील, अण्णप्पा सतुबर उपस्थित होते.
सिंदखेड येथील बाधितांना आहेरवाडीतील मल्लप्पा कोनापुरे प्रशाला येथे हलवण्यात आले आहे. या ठिकाणी शिवानंद कोनापुरे, सरपंच नरसप्पा दिंडोरे, प्रभाकर दिंडोरे, रुद्रप्पा बाके, शिवानंद बाके, योगीराज पाटील उपस्थित होते. तर संजवाड येथील पूरग्रस्तांची सोय बंकलगी प्रशालेत केली असून येथे बंकलगीचे सरपंच राजकुमार सगरे, चेंडके, कोणदे, अंबिका पाटील उपस्थित होते.
अनेक बाधित आजारी असून त्यांची तपासणी डॉक्टरांचे पथकाने केली. डॉ.आप्पासाहेब उमदी, डॉ.अभिजीत शहा, श्री व सौ.डॉ. मठ यांनी तपासणी करून औषधोपचार केले. बृहन्मठ संस्थेचे पदाधिकारी सचिव शांतय्या स्वामी, राम दाते, सुनील गौडगांव, किरण भंडारी, धीरज कुंभार, सिध्दु दुधनी, मठातील सेवकवर्ग व डॉक्टर्स टिम यांनी मदतीचे वाटप केले. संकट समयी गुरुमाऊली काशी जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रसादरुपी आशीर्वाद मिळाल्याचे सांगताना पूरग्रस्तांना गहिवरून आले.
*आ.सुभाषबापू यांचाही पुढाकार*
हत्तुर पूरग्रस्तांना बृहन्मठ होटगी मठ व आमदार सुभाष देशमुख यांच्या वतीने जेवण, तसेच ब्लँकेट व पाण्याचे बॉटल वाटप केले. याप्रसंगी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक बसवराज केंगनाळकर, सरपंच राजू कुलकर्णी, राजू भरले, रावसाहेब होनमाने, भरले सावकार व ग्रामस्थ, अतुल गायकवाड, आप्पा मोटे, दीपक कदम, धीरज कुंभार, सिद्धू दुधनी, दयानंद आंटद उपस्थित होते. आ.सुभाष देशमुख यांच्यावतीने बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांची टीम दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागात मदत कार्यात सक्रिय आहे.
What's Your Reaction?