गड्डायात्रेचा फटका,यंदा घसरणार मतटक्का! हिंदू मतदार घराबाहेर पडला नाही तर?

आज यण्णीमज्जन,उद्या भोगी,14 रोजी संक्रांत,तर 15 जानेवारीला मतदान आणि दारूकाम, सोलापूरच्या यात्रेबाबत निवडणूक आयोग/प्रशासन गाफील की मतदान घसरण्यास अनुकूल

Jan 12, 2026 - 01:32
 0  177
गड्डायात्रेचा फटका,यंदा घसरणार मतटक्का! हिंदू मतदार घराबाहेर पडला नाही तर?

(विजयकुमार पिसे)

यंदा इंग्रजी वर्षाची (2026)सुरवातच निवडणुकीने होत आहे, दर पाच वर्षांनी लोकशाहीचा उत्सव होतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल 9 वर्षांनी घेतल्या जात आहेत. मतदान वाढवण्यासाठी आग्रह राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग/प्रशासन आणि सरकार देखील करते. सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्‍वर यात्रेच्या काळात मतदान करवून घेण्याच्या अट्टाहासापायी यंदा मतटक्का घसरला तर घसरण होऊ दे; अशी आयोगाची भूमिका तर नसावी, ही शंका येते.

    15 जानेवारी रोजी मतदान आणि दुसर्‍या दिवशी 16 रोजी लगेचच मतमोजणी होणार आहे. न्यायालयाच्या दट्ट्यामुळे आायोगाने तारखा जाहीर केल्या खर्‍या. पण सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्‍वर यात्रेची ऐतिहासिक परंपरा आहे. ब्रिटिशांचा अंमल असतानाही त्यात खंड पडला नाही. आंध्र, कर्नाटक आणि मराठवाड्यातून लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात. चार दिवस चालणार्‍या यात्रेत 1930 मध्ये ब्रिटिशांनी मार्शल लॉ चा अंमल करून धार्मिक़ भावना भडकावण्याचा प्रयत्न केला होता. आज 12 रोजी यण्णीमज्जन, 13 रोजी भोगी अक्षता सोहळा, आणि 14 रोजी होमहवन असा धार्मिक विधी आणि 15 रोजी शोभेचे दारूकाम त्यानंतर 16 तारखेला कप्पडकळ्ळी असे कार्यक्रम आहेत. नेमके 15 रोजी मतदान घेण्याचा दिवस सोलापूरकरांच्या लोकशाही उत्सवावर विरजण घालणारा प्रकार निवडणूक आयोगाकडून होत आहे.

     देशात अनेक विधानसभा निवडणूक काळात मुस्लिम बांधवांचे सण आलेले असताना काही राज्यांमध्ये मतदानाच्या तारखा बदलण्यात आल्या, ही वस्तुस्थिती आहे. एरवी लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत, किंवा सहलीवर जातात, अशी तक्रार असते. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करा,असा आग्रह देखील आहे. राजकीय पक्ष व कार्यकर्ते मतदान घडवून आणण्यासाठी (प्रशासनापेक्षा) अधिक़ पराकाष्ठा करतात. त्या प्रयत्नाला साद घालण्याऐवजी निवडणूक़ आयोग वा प्रशासन सोलापूरच्या गड्डा यात्रेत (त्याच दिवशी) मतदान ठेवून कोणता हेतू साध्य करत असतील? 

यासंदर्भात यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि आ.विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकांच्या तारखा ज्या दिवशी जाहीर केल्या,त्याच दिवशी 15 तारखेच्या मतदानाबद्दल आपले मत प्रदर्शित केले होते. मतदान टक्का घसरणार याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.पण प्रशासनाकडून याविषयी कोणतेच मत वा प्रयत्न झाले याबद्दल स्पष्टीकरण केले नाही. देशातील अशा संस्था *मेरी मर्जी प्रमाणे वागत आहेत,अशी हाकाटी विरोधक करीत असतात, आहेत. पण दखल घेतली जात नाही,असा दुर्दैवी अनुभव आहे. त्यामुळे 15 रोजी अपेक्षित मतदान झाले नाही, वा *हिंदू मतदार घराबाहेर पडला नाही तर त्याचा *फटका नेमका कोणाला बसतो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. याकडेही लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. अन्यथा...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow