होम मैदानावर "एक है तो सेफ है" ची गर्जना!
मोदींनी सोलापूरकरांची मने जिंकली... लक्ष्यवेधची न्यूज पोस्ट परफेक्ट

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : एक है तो सेफ है। एक है तो नेक है। बटेंगे भी नही, कटेंगे भी नही। या घोषणांची सध्या जोरात चर्चा, तितकेच महत्व आणि गांभीर्य आहे. मंगळवारी सोलापूऱच्या होम मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या साक्षीने *एक़ है तो सेफ है* ची गर्जना हजारो उपस्थित सोलापूरकरांनी केली. आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना "विजयी भव" असा आशीर्वाद दिला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मंगळवारी होम मैदानावर पार पडली. हजारोंच्या संख्येने जिल्हाभरातून नागरिक यावेळी हजर होते. यावेळी मोदी यांनी सत्तेवर भाजपा महायुती आहे, तरच तर विकासाची गती व प्रगती आहे, असे सांगताना भाजपाचे व्हीजन मांडले. आज प्रबोधिनी एक़ादशी. हा संदर्भ देत मोदी यांनी पंढरीच्या विठुरायाला नमन केले. तसेेच आजच्या पुण्यपर्व काळात मला सोलापूरला येण्याचे भाग्य लाभल्याचे नमूद केले. विकासाची गती आणि प्रगती म्हणजेच केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंंढरीची पायी वारी, पालखी महामार्गाची उभारणी आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारे चार पदरी भव्य रस्ते. त्यांचा झालेला विकास. या उलट महाआघाडी आहे, त्यांची गाडी म्हणजे बिघाडी. त्यांना तीन चाकं, ना ब्रेक, ना चालक. आणि अशी गाडी चालवण्यासाठी त्यांच्यातच मारामारी आहे. त्यामुळे भगदड माजली आहे.
सोलापूरकरांच्या मी प्रेमात पडलोय, येथे आल्याशिवाय मला राहावत नाही, असे सांगून मोदी म्हणाले, सोलापूरची ओळख म्हणजे हातमाग, यंत्रमाग, वस्त्रोद्योग. या उद्योगांच्या विकासात आम्ही पुढाकार घेतला आहे. सोलापुरी चादर प्रसिध्द आहे. टेक्सटाईल पार्क गारमेंट उद्योगातून निश्चितच विकास होईल. पीएम योजनेतून या क्षेत्रातील कामगारांना 13 हजार कोटी उपलब्ध केले आहेत. विडी कामगारांना त्यांना हक्काचे घरकुल पीएम आवास योजनेतून दिले आहेत. आम्ही प्रामाणिक आहोत. आमची नियत साफ आहे, त्यामागे सेवाभाव आहे. आणि या उलट या सर्व योजना 60 वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या काळात करणे शक्य होत्या, पण त्यांनी केल्या नाहीत. शेतकर्यांना वीज बिलात माफी योजना राबवताना सौर उर्जाचा विकास आणि उभारणी मोठ्या प्रमाणात होत आहे. सिंचन योजनेचा लाभ शेतकर्यांना झाला आहे. माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय होेतेय म्हणून त्यात अडथळे आाणणारे विरोेेेेधक म्हणजे महाआघाडी, अशी टीकाही मोदी यांनी केली.
आरक्षणाला काँग्रेसचा नेहमीच विरोध राहिला. पत्रकार मंडळी व माध्यमांनी हवं तर जुने अंंक, इंटरनेटवर याचा शोध घ्या, माहिती घ्या. म्हणजे आरक्षणविरोधी काँग्रेसच आहे, हे लक्षात येईल. (कारण काँग्रेसअनुकूल संविधान विरोधी नॅरेटिव्ह चित्र माध्यमांनी रंगविले आहे) ओबीसी, आणि एससी आणि एसटी या जाती, जमातींमध्ये भांडणे लावली. त्यांना विकासापासून वंचित ठेवले. काँग्रेस झूट की दुकान है, अशी टीका मोदी यांनी केली. त्यासाठी आगडा आणि पिछडा समाजाने एक झाले पाहिजे. एक है तो सेफ है असा नारा मोदी यांनी यावेळी दिला. मोदी यांच्या *एक है...., तो सेफ है। या घोषणेला उपस्थित हजारो सोलापूरकरांनी साद देत, *सेफ है* चा गजर केला.
हौम मैदानावर डॉ.आंबेडकरांची प्रतिमा झळकली
मोदींची सभा सुरू असताना गर्दीमधून उपस्थित काही तरुणांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा झळकवली. हमारे भारतरत्न बाबासाहब म्हणत मोदी यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. आणि त्या तरुणांना धन्यवाद दिले. आणि आंबेडकरांची प्रतिमा आमच्या सहकार्यांच्या ताब्यात देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. संविधान बदलाच्या फेक नॅरेटिव्हला हे प्रत्युत्तर हजारो उपस्थितांच्या साक्षीने पाहायला मिळाले.
लक्ष्यवेध न्यूज पोर्टलवर मोदी यांच्या आजच्या सभेतील भाष्याविषयी भूमिका मांडली होती. पंढरीची वारी, विठुराया, प्रबोधिनी एकादशी पर्व, सोलापूरचा वस्त्रोद्योग, गारमेंट आणि सोलापुरी चादर याविषयाचीही मांडणी केली होती. तसेच एक है तो सेफ है। या घोषणांकडे लक्ष वेधले होते. या घोषवाक्याला लक्ष्यवेधच्या वाचकांनी, सोलापूरच सेफ नव्हे तर, भारत सेफ राहील आणि जग सेफ राहील, अशी कमेंट दिली होती.
मोदींनी सोलापूरकरांची मने जिंकली...
सोलापूरविषयी प्रेम व्यक्त करताना मोदी म्हणाले, आजवरच्या प्रधानमंत्र्यांपैकी मी एकमेव प्रधानमंत्री आहे, मी अनेकदा सोलापूरला आलो. सोलापूरकरांनी मला भरपूर प्रेम दिले. सोलापूरला आलो नाही, तर मी बेचैन होतो, अशा भावना व्यक्त करून मोदी यांनी सोलापूरकरांची मने जिंकली. तसेच भाजपामुळे सोलापूर बदलले. सोलापूरचा विकास झाला, असेही नमूद केले.
What's Your Reaction?






