भाजपा गटनेते पद,आणि महापौरची दिशा

भाजपा गटनेते पद,आणि महापौरची दिशा

Jan 25, 2026 - 14:35
 0  494
भाजपा गटनेते पद,आणि महापौरची दिशा

(विजयकुमार पिसे)
31 जानेवारी रोजी महापौर निवडीसाठी मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा होत असतानाच 28 रोजी पुण्यात भाजपा गट नेता निवडीसाठी सर्व 87 नगसेवकांना पाचारण केले जाणार आहे. या तारखा लक्षात घेता येत्या काही दिवसात आणखी काही घडामोडींची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच भाजपाचा गटनेता कोण? यावरून महापौरचे उत्तर मिळेल, असे मानले जाते. तिथे  दिशा स्पष्ट होईल. 
   महापौर पद खुल्या गटासाठी आहे, त्यामुळे 87 च नव्हे तर 102 नगरसेवकांपैकी (आयाराम देखील) कुणीही दावेदार असू शकतो, हे प्रथमदर्शनी घटना सांगते. पण चर्चा वेगळ्याच दिशेने भरकटत नेली जात आहे, आणि सोयीस्कर नॅरेटिव्ह तयार केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
   102 नगरसेवकांच्या आरक्षणामध्ये दोन एसटी,15 एससी,27 ओबीसी आणि 58 खुले (ओपन) असे चित्र आहे. यामध्ये महिला आरक्षण 50 टक्के आहे. महापौर ओपन झाल्यामुळे प्रथमदर्शनी खुल्या वर्गातूनच महापौरपदाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी विशेषत: मराठा समाजाकडून आग्रहाने केली जात आहे. तसेच 30 वर्षानंतर मराठा समाजाला महापौर होण्याची संधी मिळतेय,हे देखील अधोरेखित केले जात आहे. काहीजणांनी आक्रमक भूमिका घेत लक्ष वेधले आहे. पण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, गत 30 वर्षामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी यांची एकहाती सत्ता होती, तेव्हा सुशीलकुमार शिंदे/शरद पवार यांनी हातामध्ये सारी सूत्रे असताना मराठा समाजाला न्याय का दिला नाही. हेतूपुरस्सर का डावलले, केवळ या समाजाचा वापर केला, याकडे देखील लक्ष वेधले जाऊ शकते. 
याशिवाय लिंगायत,ब्राह्मण समाजाचेही उमेदवार निवडून आले आहेत, या समाजाचीही आग्रही मागणी केली जाईल. प्रत्येक घटकाला असे वाटते की अभी नही तो कभी नही. मुख्यमंत्री ब्राह्मण, त्यामुळे या समाजाला संधी मिळेल, असे देखील एक़ आशादायक चित्र रंगवले जात आहे. शेवटी सत्ताधार्‍यांना पुढील राजकीय आडाखे निश्‍चित ‍करायचे आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
   लिंगायत समाज हा देखील खुल्या वर्गात आहे, या समाजाचेही मोठ्या संख्येने नगरसेवक विजयी झाले आहेत. आठ  वर्षापूर्वी लिंगायत समाजाला महापौऱ मिळाला, पण महिला आरक्षित झाल्यामुळे यंदा पुरुष गटात संधी हवी आहे.तसेच पद्मशाली समाजाचा महापौरही केला आहे. त्यामुळे यंदा  अनेकांची नावे पुढे येत आहेत, आणली जात आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाज प्रभावशाली आहे.
गत लोकसभा निवडणुकीत *उपरा उमेदवार आणि नकारात्मक मानसिकतेचा *लादला गेला, तोच *नॅरेटिव्ह देखील तयार झाला. काही मंडळी प्रारंभीपासूनच प्रणितीताईंसाठी अनुकूल होते, दुर्दैवाने यापैकी काही जण जबाबदार *पदावर आहेत. शिवाय 2029 मध्ये भाजपा उमेदवार खा.ताई ह्याच असतील, अशी देखील चर्चा होते. त्यामुळे लिंगायत समाजाला हेतुत: डावलले जात आहे, ही भावना *प्रबळ होत आहे. डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी योग्य आणि समन्वयवादी उमेदवार असताना शीर्षस्थ नेत्यांनी त्यांचा सकारात्मक विचार केला नाही, याचा फटका लोकसभेत बसला.
 या सर्व घडामोडी पाहता ओपन वर्गातून गटनेता पुरुष/महिला निवडला गेला तर ओबीसी वा अन्य प्रवर्गातून पुरुष वर्गाला संधी दिली जाईल. 
*महापौऱ पदाचे *उत्तर गटनेता कोण यातूनच दिशा कळणार आहे. त्यासाठी येत्या एक दोन दिवसांतील घडामोडींकडे द्या लक्ष्य!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow