काँग्रेस कडून सोलापूर शहर उत्तर विधानसभेची उमेदवारीसाठी सातलिंग शटगार यांची मागणी
सोलापूर शहर -जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. सातलिंग शटगार यांनी 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे रीतसर मागणी अर्ज सादर केला.

श्री. सातलिंग शटगार हे गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस पक्षाचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते असून काँग्रेस पक्षावर त्यांची निष्ठा आहे. ते उच्चशिक्षित असून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांचा जिल्ह्यात जनसंपर्क दांडगा असून ते मुळचे अक्कलकोट तालुक्यातील सलगर या गावचे रहिवासीआहेत. मा. सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांना अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आणण्यासाठी व गृहराज्यमंत्री बनविण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. देशाचे नेते,माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे ,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांचे ते विश्वासू कट्टर समर्थक आहेत.त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी मागणी अर्ज सादर केला आहे. यावेळी शहर सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, सेवादलाचे प्रदेश सचिव अशोक कलशेट्टी,प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकीपंडला, सुमनताई जाधव, शोभाताई बोबे, भारतीताई इप्पलपल्ली, ब्लॉक अध्यक्ष देवभाऊ गायकवाड, सागर उबाळे, विश्वास गज्जम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?