लोकसभेतील पराजयाची पुनरावृत्ती, लादलेले नेतृत्व, उमेदवार आणि इनकमिंगची जत्रा
मोहोळ,मंगळवेढा,पंढरपूर तेव्हा आणि आता/अकलूज,सांगोला,कुर्डुवाडी,करमाळा,दुधनी।सचिनदादा आणि राजाभाऊंचा जादू चल गया॥
(विजयकुमार पिसे)
दीड वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागा भाजपाने गमावल्या. (गिफ्ट दिल्या?) त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाली. चिंतन नव्हे चिंता करणारा. कारण लादलेले नेतृत्व आणि उमेदवार.*अति आत्मविश्वास.. सोबत काँग्रेसमुक्तसाठी इनकमिंगची जत्रा. कोणालाही विश्वासात न घेता कार्यकर्ते,मतदार आणि विरोधक यांना गृहित धरले तर काय होऊ शकते.
दिल्ली, आणि राज्यात एकछत्री अंमल असतानाही मोहोळ,मंगळवेढा,पंढरपूर,अकलूज,सांगोला,कुर्डुवाडी,करमाळा,दुधनी नगर पालिकेत हार झाली. अपवाद सचिनदादा आणि राजाभाऊंचा. अक्कलकोट,मैंदगी आणि बार्शीत या दोन नेत्यांना देवाभाऊनी विश्वास दिला, आणि जादू चल गया! दीड वर्षानंतरच्या पराजयपासून बोध घेतला नाही तर सोलापूर महापालिका आणि 2029 चे चित्र काय असू शकेल. त्याचा हा टीझर...!
जुन्या कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध असतानाही इनकमिंग सुरूय. पहिला निकाल पाहू या.. *मोहोळचा. क्षीरसागर परिवाराचा राजकीय प्रभाव.सोबत अनगरकरांची मोठी ताकद असूनही केवळ 22 वर्षीय तरुणीने चीतपट केले. अनगरकर पाटील आले म्हणजे आम्ही जिंकलो, असे *विकास व्हिजन मांडून भुलभुलैय्या करणार्या तालुक्यातील काही *(सातपुतेंचे विश्वासू) नेत्यांपासून सावधान राहण्याची गरज आहे. अन्यथा... अनगरकर खरं सांगतात. मोहोळमध्ये आम्ही चमत्कार करू शकत नाही. अनगरची मी ग्यारंटी देतो. त्यांनी ती बिनविरोध करून दाखवली.
मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये परिचारक आणि आ.आवताडेंची मोठी ताकद. पण तिकीट वाटपात संघटनेला विश्वासात घेतले किती? अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण काय करणार बिचारे. *पालक म्हणून लादलेले नेतृत्व आणि सोबतीला सातपुते. निकाल समोरच आहे. सोलापूऱ लोकसभेत आणि माळशिरस विधानसभेतही रामभाऊ सातपुते पुरते निष्प्रभ ठरले. तरीही नेतृत्वाचा त्यांच्यावर प्रचंड(!) विश्वास. म्हणून काँग्रेसवाल्यांनी करून दाखवले. हे पार्सल परत पाठवू! अकलूजकर किती *घायल आहेत, हे नगर पालिकेचा निकालच सांगतो. त्यामुळे खा.धैर्यशील भैय्या कॉलर उडवून म्हणाले, मी किती *घातक आहे.शरद पवारांच्या पक्षात गेल्यानंतर आठवा तेव्हाचा सातपुतेंबद्दलचा डायलॉग. त्यांचा संताप पक्षावर,मोदी/शाह,फडणीसांवर नाही, तर लादलेल्या अश्या नेतृत्वावर आहे. याचा विचार केव्हा तरी करायलाच हवा.
अकलूजकरांची तीच ताकद, तोच संताप माढा मतदारसंघातील कुर्डुवाडी, करमाळा आणि सांगोल्यातील निकालात दिसला. त्यामुळे सांगोल्याचे दीपक आबा,गणपत आबांचे नातू तसेच माढ्यातील शिंदे परिवार आणि करमाळ्यातील बागल परिवाराचे भाजपात इनकमिंग झाले तरी फरक काही पडला का?
शहाजीबापूंची फसवणूक आणि त्या रात्री पडलेली रेड यामुळे सहानुभूती मिळाली. भाजपाने शेकापचा उमेदवारच पदरात घेतला होता. शेकाप,राष्ट्रवादी सोबतीला असूनही शहाजीबापूंच्या "आनंदा"ने चकीत केले.
देवाभाऊन्च्या दोन पठ्ठ्यांनी केले कल्याण..
11 पैकी तीन नगरपालिका ताब्यात घेउन देवाभाऊच्या दोन पठ्ठ्यांनी भाजपाचे "कल्याण" केले. अक्कलकोट शत प्रतिशत आणि र्मैदर्गीत प्रथमच कमळ फुलले. आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी पक्षाचा विचार पोहोचवण्यासाठी प्रसंगी मैंदर्गीत मतदानादिवशी *बूथवर बसून कार्यकर्त्यांना विश्वास दिला. बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांनी वर्षभरापूर्वीच्या पराजयाची परतफेड केली. शिंदे सेनेशी युती करून त्यांनी शहाणपण दाखवले. कुस्ती/*मस्ती नाही दोस्ती केली. कहो दिलसे सोपल फिरसे नही, तर राजा शेवटी राजाचा असतो हे करून दाखवले. दुधनीत अपेक्षित निकाल लागला. म्हेत्रे परिवाराने स्वत:ला सिध्द केले. आधी घर (दुधनी) मजबूत करू. नंतर तिकडे..
*त्यामुळे भाजपात अलीकडे लादलेले नेतृत्व, आम्ही ठरवू तीच दिशा(हीन)आणि संघटना बेदखल करण्याची कृती. शिवाय इनकमिंगचे मोहोळ.
असेच चित्र राहिले तर सोलापूर महापालिकेत 75 पार या नार्यापासून सावध राहावे लागेल. अन्यथा 2029 ची भीती कायम पाठिशी.पुन्हा काँग्रेसयुक्त गिफ्ट!!
What's Your Reaction?