माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे पालकमंत्र्यांना साकडे
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे पालकमंत्र्यांना साकडे
सोलापूर : मनपा प्र.क्र.24 क, प्र.क्र. 26 ब, ह्या ठिकाणी एसटी आरक्षण आहे.तिथे भाजपचे निष्ठावंत, पदवीधर, निष्कलंक, निस्वार्थी असावे असे मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आग्ऱह आहे. इनकमिंगना संधी नाही असेही म्हटले आहे. त्या अनुषंगाने भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे,आ.कल्याणशेट्टी,आ.सुभाषबापु,अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि माजी आ.दिलीपराव माने यांना निवेदन दिले.
2017 मध्ये भाजपकडून प्र.क्र.26 ब मधून निवडून आले. आता प्रभाग 24 क मधून वृषाली अनिल चव्हाण व प्रभाग 26 ब मधून अशितोष अनिल चव्हाण हे आदिवासी पारधी समाजातील उच्चशिक्षित,पारदर्शक,पदवीधर निष्कलंक,निस्वार्थी उमेदवार आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला असून व मुलाखतही दिली आहे. याठिकाणी भाजप पक्षाकडून एबी फॉर्म दिल्यास ते 100% टक्के निवडून येतील.तसेच आम्ही प्रभाग 26 मध्ये 222 नगरांमध्ये घराघरात पर्यंत पोहोचलो असून अनेक नगरात विकासाद्वारे कायापालट केला आहे. जनता आमच्या पाठीशी असून त्यांचे समर्थन आणि मनोगतही येत आहे.
या भागातील विकास माजी नगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण व त्यांचे नव्याने उमेदवारीसाठी इच्छुक सुपुत्र आशुतोष अनिल चव्हाण व मुलगी वृषाली अनिल चव्हाण हेच करू शकतात असे प्रभागातील सर्व सामान्य जनता सोशल मीडिया,व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम,वर आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. याकडे लक्षात घेउन या प्रभागात चव्हाण यांनाच उमेदवारी द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.
What's Your Reaction?