युती.. कळीचा मुद्दा जागा की पदांचे वाटप;अन्यथा स्वबळ सर्वोत्तम
2017मध्ये सेना/महेश कोठेंची ताकद 21पुरतीच मर्यादित.आणि आता? लादलेल्या युतीमुळे कदाचित कार्यकर्त्यांमध्ये भडका आणि दगाफटकाही
(विजयकुमार पिसे)
मुंबईत 150 जागांवर भाजपा,शिवसेनेची पहिली फेरी पार पडली. सोलापुरात युतीची फक्त प्राथमिक चर्चा झाली. पालकमंत्री, निवडणूक़ प्रमुख आणि तीनही आमदार जेव्हा लक्ष घालतील तेव्हा युतीमुळे होणारा नफा तोटा समोर येईल. आणि चर्चेच्या जेव्हा फेर्या सुरू होतील तेव्हा जागा किती आणि सत्ता आल्यानंतर महापालिकेत पदांचे वाटप किती होणार? यावर युतीचे भवितव्य अवलंबून राहील. न पेक्षा स्वबळ लढलो तर दोन्ही पक्षांच्या कार्यक़र्त्यांना लढण्याचे स्वातंत्र्य मिळेल. अन्यथा लढण्याची संधी मिळाली नाही तर इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये भडका उडेल. साहजिकच पुढे दगाफटका देखील बसू शकतो. म्हणून सावधान!!
राज्यात महायुती आणि खाली फक्त युती. जी नैसर्गिक़ आहे.(बाळासाहेब आणि महाजन/मुंडे यांची) त्याची मधुर फळे सध्याचे नेते उपभोगताहेत. पण ही फळे खाली कार्यक़र्त्यांच्या नशिबी नाही. त्यांच्या वाटेला फक्त संघर्ष आणि आता इनकमिंगमुळे उचला फक्त सतरंज्या. ही उपेक्षा आणि उपहास.असो.
सोलापुरात 102 जागा आहेत. गत मनपा निवडणुकीत भाजपा 49 आणि शिवसेना 21. विरोधी पक्षाची निर्णायक ताकद असताना युतीमध्ये सहभागी. त्यामुळे काहींचा वैयक्तिक फायदा झाला असेल. केवळ महेश कोठेंमुळे शिवसेनेची मजल 21 पर्यंत गेली. आता 21 पैकी सेनेत आहेत नेमके किती. हाताच्या बोटावर मोजता येईल. इतकेच. त्यामुळे तेवढ्याच जागांवर शिवसेनेची बोळवण करणे हा भाजपाचा मामला. त्यामुळे युती करायला असा वेळ लागेल किती. पण..
जेवढ्या जागा जिंकल्या तेवढ्याच जागा आमच्या पदरात पडल्या पाहिजेेत, ही शिवसेनेची रास्त मागणी. पण सेनेच्या अपेक्षा मोठ्या आणि समाधान किंचीत. हे अटळ सत्य. **उदा.प्रभाग 7. चारही जागा सेनेच्या. आता तिथे दोनच नगरसेवक त्यांचे राहिले. म्हणजे युतीमध्ये तेवढ्याचा जागा वाट्याला येणार.(अमोल शिंदे आणि सारिका पिसे) आ.कोठे इथून नगरसेवक झाले, ती जागा भाजपाला. नाना काळेंसाठी त्यांनी आरक्षित केली. दुसर्या स्व.मंदाकिनी पवार. इथे त्यांच्या सुनबाई किंवा मुलगा दावा करतात. ते देखील भाजपात.घरकुलमध्ये आठ जागा कोठेंनी जिंकल्या. तेथील सगळेच शिवसैनिक आता भाजपावासी. पण इथे संघर्ष आहे नवा/जुना. म्हणजे सेनेच्या हाती भोपळा. प्र.12/19. येथे विनायक कोंड्याल आणि गुरूशांत धुत्तरगाव (बॅट). दोघेही कोठे समर्थक. आता भाजपात. त्यामुळे यांचा दावा. पण?
प्र.6 चारही सेना. गणेश वानकर,शेजवाल, खटके,बरगंडे.वानकर उबाठात राहिले. शेजवालांकडे धनुष्यबाण, ते त्यांना पुन्हा मिळेल.राणे समर्थक खटके भाजपात. येथील तीन जागांवर भाजपाचा दावा. प्र.23 लक्ष्मणकाका जाधव, उमेश गायकवाड. येथे युतीत फिफ्टी. म्हणजे युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येतात फक्त 15 जागा. यापैक़ी किती वाट्याला येतील आणि निवडून किती येतील. आणि युतीच्या वाटाघाटीत अपेक्षा मोठी. आपला आवाका पाहून रास्त मागणी झाली तर युतीची चर्चा पुढे सरकेल. अन्यथा...?
**अशा स्थितीत स्वतंत्रपणे लढले तर दोन्ही पक्षांना आपली ताकद अजमावण्याची संधी.शिवाय कार्यकर्त्यांना लढण्याचे मोकळे स्वातंत्र. ना बंड ना थंड. फक्त **माहितीसाठी.. 2017 मध्ये युतीऐवजी महेश कोठे यांना स्वतंत्रपणे 20 जागा देण्याची भाजपाची तयारी होती. त्यास तेही सहमत. शिवस्मारकातील बैठकीत कागदावर प्रभागाचे क्रमांक पाहिले आणि आ.विजयकुमार देशमुखांसमवेतची बैठक सोडली. ते तडक मुंबईत मातोश्रीकडे रवाना झाले. युती न करताही त्यांच्या पक्षाने/कोठेंनी 21 जागाच जिंकल्या. 2017 मध्ये भाजपाने (आम्ही) जो अंदाज केला होता त्याच्या पलीकडे ना शिवसेना गेली ना महेश कोठे. त्यामुळे कोठेंशिवाय मनपा चालत नाही, यात तथ्य किती? त्यासाठी ऑनग्राउंड अभ्यास लागतो. बुध्दीबळाचाही कस लागतो. आता लेंडकी नाल्यातून खूप पाणी वाहून गेले आहे. आठ वर्षानंतर म्हणजे आता 2025 मध्ये भाजपा कुठल्या कुठेे आणि शिवसेना कुठे? ती भंगलीय. शिवाय कस असलेले नेते किती?
**शेवटी राहिला मुद्दा निवडून आल्यानंतर मनपातील पदांचा. उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि अन्य समित्यांचे सभापती. त्यावर शिवसेना आग्रही राहिली तर युतीच्या चर्चेला ब्रेकच लागेल.
What's Your Reaction?