फडणवीस, गुडेवार यांना म्हणाले ओके!!
सोलापूर भाजपाईंनी डोळे विस्फारले माजी आयुक्त गुडेवार 'शहर मध्य' मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक, त्यानी भाजपाकडे मागितली उमेदवारी

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूर शहर मध्य मधून भाजपाकडे उमेदवारी मागितलेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यात आश्चर्य म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना 'ओके' असा रिप्लाय मेसेज दिला आहे.
श्री. गुडेवार भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 'सोलापूर शहर मध्य' मधून निवडणूक लढविण्याचा त्यांचा इरादा आहे. याबाबत त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. पण थेट फडणवीस यांंचेकडे! त्यामुळे भाजपाईंचे डोळे विस्फारले आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान गुडेवार यांनी काही स्थानिक पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. पुढे काही हालचाल दिसली नाही, असे समजते. त्यामुळे गुडेवार यांनी थेट फडणवीस मार्ग निवडला.
शहर मध्य मतदारसंघात महायुती धर्मानुसार भाजपने ही जागा आपल्याला सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची आहे. पूर्वी भाजप-शिवसेनेची युती असताना शहर मध्य मतदार संघ शिवसेनेकडे असायचा. सन २०१४ विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात युती तुट ल्यानंतर भाजपने या जागेवरून निवडणूक लढवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमध्ये भाजपा निवडणूक लढणार की महायुती धर्मानुसार मित्र पक्षाला संधी देणार याची उत्सुकता आहे.
भाजपाकडून पांडुरंग दिड्डी यांचा २०१४ पासून दावा आहे. याशिवाय अलीकडेच भाजपात आलेले देवेंद्र कोठे, अंबादास गोरंटला, श्रीनिवास संगा आदी पद्मशाली तेलुगू भाषिक या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आता यामध्ये श्री गुडेवारांची यामध्ये भर पडली आहे. सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी राजकारणात येण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस करून सोलापूर शहर मध्यमधून आपण विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत, असे सांगत उमेदवारी मिळण्याविषयी विनंती केली आहे.
श्री गुडेवार हे सन २०१३ ते २०१५ या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त होते. राजकीय हस्तक्षेपाला थारा न देता कर्तव्यकठोरपणे काम करण्याच्या पद्धतीमुळे गुडेवार सोलापुरात लोकप्रिय ठरले होते. नाशिक विभागीय उपायुक्तपदी काम करताना ते डिसेंबर २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर गुडेवार
हे राजकारणात येण्यास इच्छुक आहेत, तेही केवळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून.
ते पद्मशाली समाजाचे आहेत. श्री गुडेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हाट्सअपवर मेसेज करून आपल्याला उमेदवारी मिळण्याविषयी विनंती केली. त्याला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी 'ओके , विल चेक' , असे उत्तर दिले आहे. गुरुवारी सोशल मीडियावर गुडेवार हे सोलापुरातून भाजप तर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, असे वृत्त व्हायरल होताच सर्वत्र चर्चेला उधाण आल्याचे चित्र दिसून आले.
गुडेवार हे पद्मशाली समाजाचे असून ते मूळ वसमतचे (जि. हिंगोली) रहिवासी आहेत. सोलापुरातील पद्मशाली समाज बहुतांश प्रमाणात भाजपच्या पाठीशी आहे. सोलापुरात भाजपाची ताकद वाढण्यामागे या समाजाचा मोठा वाटा आहे. सोलापुरात आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत पद्मशाली समाजाला भाजपातर्फे एकदाही संधी मिळाली नाही. यंदा पद्मशाली समाजाला ही संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे. यामुळे गुडेवार यांनीही दावा केला
आहे. २२ जून दरम्यान गुडेवार एका कार्यक्रमानिमित्त सोलापुरात आले होते. तेव्हा त्यानी सोलापुरात काही भेटीगाठी ही घेतल्या होत्या.
What's Your Reaction?






