लाडक्या बहिणींच्या पैशावर बँकांचाही 'हात'

कांंग्रेसचाही आडवा "हात"

Sep 2, 2024 - 12:01
 0  32
लाडक्या बहिणींच्या पैशावर बँकांचाही 'हात'

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तीन हजाराचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर झाला असताना सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेत काही बँका हात मारताना दिसत आहेत. त्यात भर म्हणजे कांग्रेसनेही आडवा "हात" मारण्याचा प्रयत्न केला आहे. 

महिलांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेतून बँका मिनिमम बॅलन्स चार्ज, एस.एम.एस. चार्ज, थकीत कर्ज वसुली या नावाखाली परस्पर रक्कम कपात करून घेत आहे. 

त्यामुळे महिलांना मिळालेल्या तीन हजार रुपयातून अवघे हजार अकराशे रुपयेच हातात मिळत असल्याने महिलांमधून बँकांच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनेक महिलांची विवाहाच्या अगोदर माहेरी बँकामध्ये असलेल्या खात्यावर विवाहानंतर व्यवहार झाले नाही. परंतु ते खाते आधार लिंक असल्याने *मुख्यमंत्री लाडकी बहीण* योजनेच्या पैसे पूर्वीच्याच बँक खात्यात जमा झाले आहे. 

तर ग्रामीण भागात जनधन योजनेसाठी किंवा गॅस अनुदानासाठी अनेक महिलांनी बँकेत खाते उघडले.

 परंतु, अनेक वर्ष त्या खात्यात व्यवहार झाले नसल्याने काहींच्या खात्यामध्ये पैसेच शिल्लक नाही.

 परंतु ते खाते आधारला लिंक असल्याने अनेक महिलांचे पैसे त्या खात्यात जमा झाले. जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या दोन महिन्याचे एकूण तीन हजारांचा हप्ता कागदपत्रांची पूर्तता केलेल्या महिलांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.

महिला बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्या खात्यातून काही बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज, एस.एम.एस. चार्ज, थकीत कर्ज वसुली या नावाखाली परस्पर रक्कम कपात करून घेतलमुळे कपात करून काही महिलांच्या खात्यात तीन हजार पैकी अवघे हजार अकराशे रुपयेच शिल्लक राहिले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात जमा झालेली सर्वच्या सर्व तीन हजार रुपये रक्कम कपात झाली असल्याने महिलांच्या आनंदावर विरजण पडले आहे. 

काही बँक व्यवस्थापकांशी संपर्क केला असता ते सांगतात तो बँकेचा नियम आहे. विशेष म्हणजे बँक युनियन नेते देवीदास तुळजापूरकर यानीही बँकेची बाजू घेतली आहे. तुळजापूरकर हे कॉम्रेडी नेते आहेत. म्हणजे बँका, डाव्या विचारांचे कामगार नेते, काँग्रेस यांची मिली- भगत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन राज्याचे प्रधान सचिव यांनी लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात कोणत्याही प्रकारची कपात करू नये, अशा प्रकारचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow