'दादा'गिरी कोणाचीही खपवून घेणार नाही!

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर, लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून बाहेरचा उमेदवार लादला. त्याचा फटका बसला. या प्रकाराने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लादलेला उमेदवार नको, अशी भूमिका घेऊन, निष्ठावंत कार्यकर्ते यांनी ,तसा सूर आळवला आहे.

Aug 4, 2024 - 08:39
Aug 4, 2024 - 08:49
 0  295
'दादा'गिरी  कोणाचीही खपवून घेणार  नाही!

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर  लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून बाहेरचा उमेदवार लादला. त्याचा फटका बसला. या प्रकाराने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लादलेला उमेदवार नको, अशी भूमिका घेऊन, निष्ठावंत कार्यकर्ते यांनी ,तसा सूर आळवला आहे. 

      सध्या भाजपात इनकमिंग आणि बाहेरील नेत्यांची अर्थात उपऱ्या नेत्यांची चलती आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे सात आमदार असूनही एकालाही मंत्री केलेले नाही. ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार यांची सत्ता आली. महाविकास आघाडी आणि महायुतीनेही जिल्ह्याबाहेरील नेतृत्व पालकमंत्री म्हणून लादले. त्यामुळे भाजपात अस्वस्थता आहे. शिवाय शासकीय कमिट्यांवर कोणालाही संधी दिली नाही. तसेच डीपीडीसीच्या बैठका नियमित होत नाहीत. त्यामुळे विकास कामांचा निधी रखडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची सकारात्मक भूमिका कशी मांडायची हा प्रश्न आहे. भरीस भर म्हणजे इच्छुक उमेदवारांच्या नावांच्या चर्चेत उपरे आणि इनकमिंग नेत्यांची नावे पुढे आहेत. नव्हे त्यांचाच भाजपा श्रेष्ठींकडे बोलबालाही आहे.

   दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नेते मंडळी सोईस्करपणे खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. आणि यामध्येही आपल्यालाच संधी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे, असाही सूर ऐकू येतो. यामुळे साहजिकच स्थानिक निष्ठावंत आणि तुल्यबळ उमेदवार यांना डावलले जाईल, अशीही भीती आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूर मनपाचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शहर मध्य मधून उमेदवारी मागितली आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या मेसेजला फडणवीसांकडून ओके रिप्लाय आला आहे. तिकडे निष्क्रिय ठरलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सोलापुरातून निवडणूक लढविण्याची हालचाली सुरू केले आहेत. अलीकडेच त्यांनी दोन ठिकाणी धन्यवाद मिळावेही घेतले. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पालकमंत्र्यांकडून भाजपासाठी आश्वासक भूमिका समोर आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.  

तीन दिवसांपूर्वी लक्क्षवेध न्यूज पोर्टलवर, 'होशियार, कोल्हापूरकरकडून निवडणूक सर्वे' असे वृत्त आल्यानंतर काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची खातरजमा करून घेतली. तसेच माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही या संदर्भात टाकलेली पोस्ट व्हायरल झाली. ही बाब भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी उचलून धरली आहे. आणि त्यांनी या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे. इच्छुक अन्य काही उमेदवार तसे, तुल्यबळ असले तरी त्यांच्या नावात, 'दादा' हे विशेष नाम जोडले गेले आहे. हाच निव्वळ योगायोग....असला तरीही आता , '*दादागिरी*' खपवून घेणार नाही, हा मुद्दा कार्यकर्ते आग्रहाने मांडत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow