सोलापूर जनता बँक़ निवडणुकीत "परिवारा"ची विजय गुढी

आज मतमोजणी, 5000पेक्षा अधिक मताधिक्क्यांनी 10 उमेदवार जिंकणार, 17 जागा यापूर्वीच बिनविरोध

Mar 19, 2026 - 23:30
Mar 19, 2026 - 23:36
 0  59
सोलापूर जनता बँक़ निवडणुकीत "परिवारा"ची विजय गुढी

(विजयकुमार पिसे)
    सहकार क्षेत्रात मानदंड प्रस्थापित संघ परिवारातील सोलापूर जनता सह.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व 17 उमेदवार जिंकण्याचा विश्‍वास असून आज मतमोजणीनंतर 5 हजारापेक्षा अधिक मताधिक्क्यांनी विजयी मोहोर उमटणार आहे. 
     काल बुधवारी 10 जागांसाठी 5679 मतदारांनी मतदान केले होते. 
परिवार पॅनललाच मतदान करा, असे आवाहन सर्व स्तरातील अनेक मान्यवरांनी केले होते. 17 पैकी7 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. परिवार पॅनलचे निवडणूक चिन्ह कीटली असून 10 उमेदवारांसाठी सभासद मतदारांनी त्यावर फुलीचा शिक्का मारून बहुमताने निवडून देण्याचा निश्‍चय केला. आता 20 रोजी केवळ मतमोजणीची औपचारिकता राहिली आहे. सर्व निर्वाचित उमेदवार आणि तमाम सर्व सभासद बांधवांचे लक्ष्यवेध न्यूज परिवारचे वतीने अभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
     17 जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. या सर्वांसाठी सोलापूर शहरातील नूमवि आणि एसपीएम स्कूल येथे तसेच सोलापूर शहराबाहेर जिथे बँक शाखा आहेत, तिथे सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषोत्तम उडता, सीए आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, राजेश पवार, बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे, सीए गिरीश बोरगावकर, प्रमोद भुतडा, विष्णू मोंढे आणि अ‍ॅड. मल्लिनाथ शहाबादे हे परिवार पॅनलचे उमेदवार आहेत. या सर्वांच्या विजयाची खात्री आहे. 
   बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी, डॉ. हर्षल डंबळ, अमित आपटे, चरणसिंग चौहान, चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, रवींद्र साळे हे सात उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. परिवार पॅनलचे निवडणूक प्रमुख अ‍ॅड.मिलींद कुलकर्णी आणि सहनिवडणूक प्रमुख विद्यमान संचालक जगदीश भुतडा आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow