"परिवार पॅनल"ची विजय गुढी "लक्ष्यवेध"चा अचूक अंदाज

सर्व 10 उमेदवार जिंकले,5278 सर्वाधिक मते

Mar 20, 2026 - 16:28
 0  113
"परिवार पॅनल"ची विजय गुढी "लक्ष्यवेध"चा अचूक अंदाज

(विजयकुमार पिसे)

     सोलापूर जनता सह.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व 10 उमेदवार 5000 पेक्षा अधिक मताधिक्यानी जिंकले आहेत. निवडणूक निकालाविषयी *लक्ष्यवेध न्यूज*चा अंदाज बिनचूक ठरला आहे. परिवार पॅनलचे 7 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध घोषित झाले आहेत.

सर्व विजयी उमेदवारांचे लक्ष्यवेध न्यूजच्या वतीने अभिनंदन.

     17 मार्च रोजी 10 जागांसाठी 5679 मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात 12 उमेदवार होते. त्यामुळेच नाईलाजास्तव मतदान घ्यावे लागले. 5679 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 17 पैकी7 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. आज 20 रोजी केवळ मतमोजणीची औपचारिकता होती. 6 फेऱ्यांमध्येच मतमोजणी प्रक्रिया संपली. 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. या सर्वांसाठी सोलापूर शहरातील नूमवि आणि एसपीएम स्कूल येथे तसेच सोलापूर शहराबाहेर जिथे बँक शाखा आहेत, तिथे सभासदांनी मतदानाची सोय केली होती. 

     निवडणुकीतील विजयी उमेदवार यांना मिळालेली मते याप्रमाणे : पुरुषोत्तम उडता *5164, सीए आनंद करवंदे *5129, सुरेश चिक्कळी *5053, महादेव न्हावकर *5124, राजेश पवार *5267, बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे *5255, सीए गिरीश बोरगावकर *5278, प्रमोद भुतडा *5275, विष्णू मोंढे *5019 आणि अ‍ॅड. मल्लिनाथ शहाबादे *5035 हे परिवार पॅनलचे विजयी उमेदवार असून पराभूत अपक्ष भारत तांबोळकर *565 मते आणि विश्वनाथ निरंजन यांनी *476 मते घेतली.

   बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी, डॉ. हर्षल डंबळ, अमित आपटे, चरणसिंग चौहान, चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, रवींद्र साळे हे सात उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते. परिवार पॅनलचे निवडणूक प्रमुख अ‍ॅड.मिलींद कुलकर्णी आणि सहनिवडणूक प्रमुख विद्यमान संचालक जगदीश भुतडा यांनी यशस्वी व्यूहरचना आखली होती. संघ परिवारातील सर्व संस्था, संघटना यांचे कार्यकर्ते व स्वयंसेवक तसेच पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow