'शोला'पूर 'सेफ' ठेवण्यासाठी मोदी आज होम मैदानावर
'शोला'पूर 'सेफ' ठेवण्यासाठी मोदी आज होम मैदानावर

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : एक है तो सेफ है। एक है, तो नेक है। बटेंगे नही, और कटेंगे भी नही। अशी निर्णायकी सभा आज मंगलवारी होम मैदानावर होणार आहे.
महाराष्ट्रात धुळ्यापासून मोदींची "एक है मिशन" सुरू झाले, आज हेच मिशन सोलापुरातही होणार असून, त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिले आहे. जानेवारीत प्रधानमंत्री आवास योजनेचे तीस हजार घरांचे वाटप मोदींच्या हस्ते झाले. या आवास योजनेत सर्व जाती धर्माच्या रहिवाशांना निवारा दिला, एकतेचा हा संदेश मोदींनी कृतीतून दाखवला. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी निवडणूक प्रचारासाठी येऊन गेले. सहा महिन्याच्या अंतराने मोदींचे विचार ऐकण्याची पर्वणी आज
प्रबोधिनी एकादशीच्या पर्व काळात होत आहे. महाराष्ट्रात बदल करा, म्हणजे दिल्लीचे तख्त ताब्यात येईल. अशी बिघाडीची भाषा महाविकास आघाडीची असून त्यांना संपूर्ण देशात अराजकता निर्माण करून बिघडलेले वातावरण बनवायचे आहे. त्याला छेद देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत फिर एक बार महायुती सरकार असा नि:श्चय मतदारांना करायचा आहे.
सोलापुरातील ही सभा म्हणजे उमेदवारी वाटपात भाजपाने केलेले सोशल इंजिनिअरिंगचे आदर्श उदाहरण. जानेवारी महिन्यात घरकुल वाटप कार्यक्रम प्रसंगी मोदी यांनी तेलुगू भाषिक पद्मशाली विणकर समाजाच्या सहवासातील अनुभव सांगितला. त्याचे स्मरण आज पुन्हा होम मैदानावर होईल, अशी अपेक्षा करूयात.
मोदीजी प्रचारक म्हणून कार्यरत असताना गुजरातेत तेलुगू भाषिक पद्मशाली विणकर समाजाच्या सहवासात होते. त्या परिवाराशी संपर्क, संवाद, याची जडणघडण झाली. सोलापूरचे विकासात तेलुगू भाषिक पद्मशाली विणकर समाजाचे योगदान आहे, त्या पार्श्वभूमीवर हातमाग, यंत्रमाग सोलापुरी चादर, टेरी टॉवेल आणि गारमेंट उद्योगामध्ये या समाजाने अनेकांना उद्योग व रोजगार उपलब्ध करून दिला. बहुभाषिक सोलापूर सिध्दरामेश्वरांच्या पावन नगरीत एकतेचा संदेश देताना, नेक रहा, आणि सेफ रहा, असे मोदींचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सोलापूर शहर मध्य मतदार संघ भाजपासाठी निर्णायक असून इथल्या मतदारांच्या माध्यमातून उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मतदार संघातील भाजपाचे उमेदवार देखील विजयी होणार आहेत. सोलापूर शहर मतदार संघ एम. आय. एम. मुळे चर्चेत राहिला आहे. आपले मत चुकीच्या दिशेने गेले तर काय होऊ शकते, हे शेजारच्या देशांमध्ये पहायला मिळते. त्यासाठी सोलापूर सेफ राखण्याची जबाबदारी आमची देखील आहे, हे निश्चित. सोलापूर सेफ है, तो महाराष्ट्र भी सेफ राहणार आहे. हाच तो एकतेचा संदेश. येत्या २० तारखेला १०० टक्के मतदानातून "शोला'पूर सेफ ठेवा हाच निर्धार, निश्चय आणि प्रतिज्ञा.
What's Your Reaction?






