महायुतीचे महासमन्वयक जाहीर

महायुतीचा महासंदेश, हिरावून घेऊ देणार नाही महाराष्ट्र प्रदेश

Oct 9, 2024 - 18:51
 0  333
महायुतीचे महासमन्वयक जाहीर

(विजयकुमार पिसे) 

सोलापूर : भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने सर्वप्रथम, निर्धारपूर्वक पाऊल उचलून आपल्या तिन्ही पक्षांचे समन्वयक जाहीर केले आहेत. या समन्वयकांच्या यादीवर नजर टाकली तर महायुतीचा इरादा स्पष्ट आहे, महायुतीचा महासंदेश हिरावून घेऊ देणार नाही महाराष्ट्र प्रदेश!

 राज्यातील 288 मतदारसंघाचे जागा वाटप अंतिमत: झाले असून विजयादशमीनंतर शिलंगणाचे सोने लुटण्यासाठी महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी महायुतीने तिन्ही पक्षांचे समन्वयक जाहीर केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघाचा विचार केला असता महासमन्वयक तगडे, खमके, निर्णायक क्षमतेचे आहेत हे त्या नावावरून स्पष्ट होते. प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी भाऊ पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, मनीष काळजे, भाजपा उपाध्यक्ष अनंत जाधव माजी गटनेते शिवानंद पाटील, माजी सभापती नाना मस्के, नगरसेवक उमेश गायकवाड, बार्शी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, प्रवीण शहा, संजय देशमुख, शशिकांत चव्हाण, केदार सावंत, के. के. पाटील, मंगेश व महेश चिवटे, महेश साठे यांचा समावेश समन्वयक म्हणून केला आहे.

भारतीय जनता पार्टी , शिवसेना एकनाथ शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यात समन्वयासाठी महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विधानसभा समन्वयक निश्चित केले आहेत. यामध्ये सोलापूर शहर जिल्हयातील सर्व विधानसभा मतदासंघांमध्ये तीनही पक्षांचा एक सदस्य घेतला आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय समन्वयक याप्रमाणे आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून गणेश चिवटे , राष्ट्रवादी कडून संजय घोडके, बार्शी विधानसभा मदारसंघात भाजपकडून रणवीर राऊत, शिवसेनेकडून मनीष काळजे, राष्ट्रवादी : अशफाफ जमादार, मोहोळ भाजपकडून शहाजी पवार, शिवसेनेचे सचिन सुरवसे, राष्ट्रवादी राम साळुंके, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजफ शशिकांत चव्हाण, शिवसेना 

महेश साठे, राष्ट्रवादी असलम चौधरी, सांगोला भाजपकडून चेतन सावंत, शिवसेनेचे लतिफ नदाफ, राष्ट्रवादी संजय मोरे, माळशिरस विधानसभा भाजपकडून के. के. पाटील, शिवसेना राजकुमार येवरकर, राष्ट्रवादी रमेश पाटील.

 समन्वयकांना तिकीट नाही

दरम्यान निवडणुकीसाठी इच्छुक असलेले नेते मंडळी व कार्यकर्ते यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली, त्यामुळे यांना उमेदवारी नाही असे मानले जात आहे. परंतु आमदार निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका त्यांना पार पाडायची आहे, अर्थात हे इच्छुक बंड करणार नाहीत, असाच त्याचा अर्थ निघतो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow