लाडके उमेदवार निवडणुकीपूर्वीच लखपती! सरोवरात पंचमुखी परमेश्‍वर प्रसन्न!!

लाडके उमेदवार निवडणुकीपूर्वीच लखपती! सरोवरात पंचमुखी परमेश्‍वर प्रसन्न!!

Jan 12, 2026 - 01:27
Jan 12, 2026 - 01:39
 0  239
लाडके उमेदवार निवडणुकीपूर्वीच लखपती! सरोवरात पंचमुखी परमेश्‍वर प्रसन्न!!

महाराष्ट्रात लाडका भाऊ आणि लाडकी बहीण असा वारंवार संदर्भ देत खूपच खातरदारी सुरू आहे. महायुती आणि मविआ यांच्यात या लाडक्यांवर कुरघोडीचेही प्रयत्न सतत होत असताना दिसतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला आता लखपती दिदी करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. सोलापुरातील जाहीर सभांमध्ये लखपती दिदीची योजना राजकीय नेत्यांनी जाहीर केली. शिवाय लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, याची ग्वाही देखील दिली गेली. तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंपूर्ण करणार असा शब्दही दिला. दरम्यान लाडक्या उमेदवारांना काही दिवसांपूर्वीच लखपती होण्याचा मान मिळाला. विमानतळ रोडवरील सरोवरात त्यांना पंचमुखी परमेश्‍वर प्रसन्न झाला, अशी चर्चा आहे.

   सोलापुरात 75 पार चा नारा काही प्रमुख पक्षांनी केला, पण प्रत्यक्षात त्यांना 75 उमेदवार देखील उभे करता आले नाहीत, तरीही काही पक्षांचा तोच निर्धार असून आहे. त्यासाठी लढणार्‍या शतप्रतिशत उमेदवारांना ताकद देखील देण्याची आवश्यकता आहे. तरच लाडके उमेदवार प्रतिस्पर्ध्यांशी जोरदार मुकाबला करू शकतील. लढाईत सर्वसंपन्न शक्ती आवश्यकता असते, शत्रूंशी दोन हात करताना कोणतीच कमतरता भासू नये, याची काळजी घेतली जाते, असे म्हणतात. लढाईत सैन्याला पुरेशी रसद मिळाली तरच युध्द जिंकता येते. अब की बार मध्ये कसलीच हाराकिरी नको, दगाफटकाही नकोच, या भूमिकेतून सर्व लाडक्या उमेदवारांना पुरेशी रसद मिळावी म्हणून लखपती करण्यात आले, अशी चर्चा आहे. त्यांच्यावर पंचमुखी परमेश्‍वर प्रसन्न झाल्यामुळे आपापल्या प्रभागात बूथ यंत्रणा भक्कम करण्यात निवडणूक प्रमुख गुंतले आहेत. लखपती दर्शनाची ही पहिली बारी होती, असे म्हटले जाते. दरम्यान काही लाडक्या उमेदवारांनी पक्षाच्या नेत्यांकडे लक्ष्मीदर्शन घेण्यास विनम्रपणे नकार दिला, असेही कळते.     

    

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow