सोलापुरात बिनविरोधची संधी भाजपाने गमावली!
निष्ठावंतांचा बळी देऊन तिकीटे कापण्यातच नेते व्यस्त, आयातांसाठी मात्र सक्रियता, उमेदवारी माघारी घेतानाही झटापट, धक्काबुक्की, हत्या! हे सारे लाजिरवाणे
(विजयकुमार पिसे)
राज्यात अनेक महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक़ 44 उमेदवार बिनविरोध करून बाजी मारली. यास सोलापूर भाजपा अपवाद ठरली. संधी आली होती, ती गमावली. उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या दिवशी झटापट,पळापळी झाली, तेच चित्र छाननीच्या दिवशी सायंकाळी दिसले. शुक्रवारी माघारच्या अखेरीस निवडणूक़ कार्यालयासमोर धक्काबुक्की आणि झटापट असा लाजिरवाणा प्रकार घडला. शिस्तबध्द पक्ष ही भाजपाची प्रतिमा. नेतेमंडळींनी तिकीटे देण्यात निष्ठावंतांचा बळी, आणि उपर्या आयातांना संधी यामध्येच अधिक़ सक्रिय होते. या सर्व घडामोडी येथील सामान्य मतदारांना अजिबात रूचल्या नाहीत. त्यामुळे *देशात आणि *राज्यात आम्ही *भाजपासोबत होतो, आता आम्हाला आमच्या *पसंतीचा उमेदवार निवडण्यासाठी *मुभा द्या, असे प्रांजळ अनेकांनी मत व्यक्त केले आहे. यामुळे *75 पार चा नारा फसतो की काय?
उमेदवारी मागे घेण्यासाठी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी दुपारी 3 पर्यंतची वेळ होती. दर पाचएक मिनिटांनी ध्वनिवर्धकावरून सुचवले जात होते तर नॉर्थकोट प्रशालेच्या निवडणूक़ कार्यालयासमोर एका सुचकाला आत चला, आत चला, अशी गळ संबंधित उमेदवार घालत होते. प्र.क्र.3 येेथे या सर्व घडामोडी सुरू असताना अन्य मंडळी सावध झाली. इतक्यात वेळही संपत आली, तेव्हा मात्र पटापट उरकण्यासाठी झटापट सुरू झाली. अपक्ष उमेदवार बाबुराव जमादार यांचे सुचक संतोष कोठे हे शारीरिकदृष्ट्या हतबल दिसले. पण ते सावध होते, त्यांनी डाव ओळखला, जमादार यांना मोबाईल करण्याच्या निमित्ताने कार्यालयाकडे जाण्याऐवजी तिथून सटकण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे एकीकडे माघार आणि दुसरीकडे सुटका यावरून गोंधळ सुरू झाला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे भाजपाचे उमेदवार संतापले. त्यांना रोखण्यात सुरेश पाटलांचे दोन पाटीलपुत्र अग्रेसर होतेच. या झटापटीत सुचक संतोष कोठे सटकले कळाले नाही. आणि वेळ टळून गेली.
या सर्व घडामोडींवरून माघार घेण्यासाठी भाजपाची रणनीती कशी होती, याचा अंदाज आला. यावेळी मात्र तिथे कुणी नेते फिरकले नाहीत. कार्यकर्त्यांनीच एकाकी किल्ला लढवला.
भाजपाने प्रतिष्ठित केलेला प्रभाग क्र.3 (महिला राखीव) येथे अविरोधची अशीच एक खेळी फसली. येथेे शिवसेना उमेदवाराने माघार घेतली. पण काँग्रेसच्या महिला उमेदवार हाती लागल्या नाहीत. या घडामोडीत सुरेश आणि राजकुमार पाटील बंधूंना मात बसली. प्रभाग क्र.2 येथेही दोन जागा अविरोधसाठी यंत्रणा सक्रिय झाली होती. त्यातून तणाव निर्माण झाला, याचे पर्यवसान एका मनसे कार्यकर्त्याच्या हत्येेत झाले. समाजातील दोन गटातील वाद होता, अशी माहिती नंतर पुढे आली. पण मनसेने या हत्येस भाजपाला जबाबदार धरले.
जुने विडी घरकुल प्र.क्र.10 येथे देखील अविरोध काही हाती लागला नाही. हा प्रभाग देखील भाजपाने प्रतिष्ठेचा केला होता. याशिवाय.
प्र.12,प्र.18,प्र.19,प्र.21 या प्रभागांमधून बिनविरोधसाठी खटपट सुरू होती. पण उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या (30 डिसें) दिवशी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि आ.कल्याणशेट्टी यांची झालेली दमछाक, आणि छाननीच्या दिवशी (31 डिसें) सायंकाळी तडवळकर यांना ज्या पध्दतीने तिथे नेले गेले. विशेष म्हणजे तेव्हा भाजपाच्या दोन उमेदवारांमध्येच ही झटापट झाल्याचे चित्र समोर आले, त्यामुळे बिनविरोधची संधी असूनही डाव साधला गेला नाही. संपूर्ण राज्यात भाजपाने सर्वाधिक बिनविरोध केले, ते येथे नेत्यांचे समन्वय व अपरिपक्वतेमुळे शक्य झाले नाही. आता *मतदार ठरवतील, आपले *मत!
What's Your Reaction?