बाराबंदी पोशाखात देवाभाउंचे सिद्धरामेश्वर दर्शन!
ग्रामदैवतास साकडे, सोलापूरकरांच्या सेवेला संधी द्या
सोलापूऱ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. तसेच पारंपारिक बाराबंदी पोशाखात सोलापूरकरांना संबोधित केले. त्यांच्या बाराबंदी पोशाखाला सोलापूरकरांनीही दाद दिली. यावेळी फडणवीस यांनी ग्रामदैवत सिध्दरामेश्वरांना साकडे घातले. सोलापूरकरांच्या सेवेला संधी द्या, अशी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोलापुरात आगमनानंतर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरास भेट दिली. तिथे पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी स्वागत केले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या गाभार्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिवत पूजा केली. मंदिरातून सभेच्या ठिकाणी आल्यानंतर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढील 5 वर्षे सोलापूरकरांच्या सेवेची संधी आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना मी श्री सिद्धरामेश्वर महाराजांकडे केली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद मिळाला की मागे वळून पहावे लागत नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले. यावेळी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नंदीध्वज आणि बाराबंदी परिधान केलेल्या भक्तांची प्रतिकृती भेट स्वरूपात देण्यात आली. व्यासपीठावर असलेली ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची भव्य मूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाराबंदीचा पोशाख, त्यांना देण्यात आलेली नंदीध्वजांची प्रतिकृतीची भेट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय चा जयघोष यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
What's Your Reaction?