भव्य पदयात्रेमुळे प्र.13मध्ये शिवसेनामय वातावरण
शिंदे गटाच्या उमेदवारांना पदयात्रेत नागरिकांचा प्रतिसाद आणि संवाद
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला प्रभाग 13 मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज काढलेल्या पदयात्रेमुळे शिवसेनामय भगवे वातावरण निर्माण झाले आहे
प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार जयंत दिनकरराव होलेपाटील (क), श्रीधर दुर्गादास आरगोंडा (ड), सौ. गीता अजय गोणे (म्हेत्रे) (अ) आणि सौ. शिवम्मा सोमनाथ बंदपट्टे (ब) यांच्या पदयात्रेला लाडक्या बहिणींसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. विकासाभिमुख भूमिका व जनतेशी थेट संवाद या माध्यमातून उमेदवारांनी प्रचारात वेग आणला आहे.शिवसेना (शिंदे गट) कडून प्रभाग क्रमांक 13 साठी अधिकृत उमेदवार म्हणून जयंत दिनकरराव होलेपाटील (क), श्रीधर दुर्गादास आरगोंडा (ड), सौ. गीता अजय गोणे (म्हेत्रे) (अ) आणि सौ. शिवम्मा सोमनाथ बंदपट्टे (ब) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाथरूट चौक येथून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ही पदयात्रा मातंग वस्ती, खड्डा तालीम परिसर, अशोक चौक, साईबाबा चौक, वालचंद कॉलेज परिसर, भावना ऋषी पेठ, क्रांती झोपडपट्टी आदी विविध भागांतून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी, युवकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवून आपला पाठिंबा दर्शविला.पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
या पदयात्रेमुळे संपूर्ण प्रभागात शिवसेनामय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या चारही उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन पॅनल प्रमुख जयंत दिनकरराव होलेपाटील यांनी यावेळी केले.या पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना (शिंदे गट)च्या उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत याचा लाभ होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?