व्वा.. ज्यांचे सर्वात कमी आमदार,त्यांचीच पॉवर,ज्या पक्षाचा आमदारच तरीही खासदारकी

राजकारणाची तर्‍हा...2019 नंतर तावडेंना न्याय,आयाराम वडकुतेंना लॉटरी,इवनातेंना संधी म्हणजे सोशल इंजिनिअरिंग

Mar 6, 2026 - 13:39
 0  194
व्वा.. ज्यांचे सर्वात कमी आमदार,त्यांचीच पॉवर,ज्या पक्षाचा आमदारच तरीही खासदारकी

(विजयकुमार पिसे)
यंदाची राज्यसभा निवडणूक अनेक अर्थांनी लक्ष्यवेधी ठरली. गतवेळी ठाकरेंची सत्तापालट झाली होती. आणि आता ज्या पक्षाचे विधानसभेत सर्वात कमी आमदार आहेत, त्यांचीच पॉवर चालली. दुसरी गंमत म्हंजे ज्या पक्षाचा एकही आमदार नाही,त्यांना पुन्हा खासदारकी. आणि 2019पासून वेटींगमधील विनोद तावडेंना न्याय मिळाला. आयाराम वडकुतेंना लॉटरी तर मायाताई इवनातेेंच्या माध्यमातून भाजपाने सोशल इंजिनिअरिंग केले. 
   ठाकरेंची सत्तापालट झाली,त्याआधी राज्यसभेसाठी महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. आताही धक्कातंत्र  दिसले, ते वेगळ्या अर्थाने. वयाच्या 82 व्या वर्षी प्रकृती साथ देत नसतानाही ज्येष्ठ नेते शरदश्चंद्र पवार काँग्रेस आणि ठाकरेसेनेच्या कुबड्या घेत राज्यसभेत पोहोचले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या श.प.पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आले आहेत. एनसीपी स्थापनेपासूनचा हा निच्चांकी स्कोर आहे. यंदा पवार राज्यसभेत जाऊ शकणार नाहीत,अशीच स्थिती होती. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे सेनेने जोर लावला होता. पवार साहेब राज्यसभेत पाहिजेच, असा आग्रह धरत दिल्ली दरबारी धाव घ्यावी लागली. तेव्हा कुठे तहे दिलसे अशा भावना व्यक्त करीत ताईंनी काँग्रेस आणि ठाकरेंचे आभार मानले. पण उमेदवारी अर्ज भरताना उध्दवजी ठाकरे उपस्थित नव्हते. त्यांची नाराजी स्पष्ट आहे. कारण ठाकरे सेनेचे मविआत सर्वाधिक 20 आमदार आहेत.
     शरद पवार साहेब राज्यसभेत, त्यांचे नातू पार्थ पवार देखील सोबत. म्हणजे आजोबा बोट धरून सभागॄहात जाणार. तिकडे कन्या लोकसभेत आणि सुनेत्राताई वहिनी विधानसभेत प्रतिनिधित्व करणार. एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार सदस्य लोकप्रतिनिधी. राजकारणात बारामतीची पॉवर मोठी आहे. शीघ्र कोट्या करणारे रामदास आठवलेंचा एकही सदस्य, ना विधानसभेत,ना लोकसभेत. तरीही त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी भाजपाने उपलब्ध करून दिली. त्यांचे नाव भाजपाने जाहीर केले,तरीही आठवलेंना आरपीआय आठवतो. म्हटले तर आजच्या राजकारणाची ही तर्‍हा.
*त्या दादांचा घात आणि हे दादा सुसाट..
  अभाविपच्या दादा पाटलांनी अभाविपच्याच आपल्या सहकार्‍याला प्रदेश भाजपा अध्यक्ष या नात्याने 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी विनोद तावडेंना नाकारली. त्यानंतर तावडे पंकजा मुंडेंसह राजधानीत गेले राष्ट्रीय चिटणीस म्हणून. तिथे अमित शाह यांना अपेक्षित निकाल दिल्यामुळे दिल्लीश्‍वरांनीच त्यांचे नाव नक्की केले.  तेव्हा कुठे विनोद तावडे यांचे पुनवर्सन झाले आहे. 
   जनजाती घटकाच्या माया इवनाते नागपूरच्या माजी महापौर, देवेंद्र फडणवीस यांनी अचूक हेरले. आणि जे चर्चेत होते, त्यांना फाटा मारत इवनाते यांनी थेट दिल्ली गाठली.
 यालाच म्हणतात अस्सल राजकारण.....एकेकाळी हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow