विहिंपच्या आक्रमक भूमिकेमुळे बार्शीत अनधिकृत भोंगे हटवले
शिवजयंतीदिनी बार्शीमध्ये तणाव, शेकडे तरुण संतप्त,पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल
बार्शी : १९ फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त बार्शीतील मुस्लिम बहुल बारंगुळे प्लॉट भागात काही विघ्नसंतोषी मंडळींनी दगडफेक केली. या घटनेमुळे शेकडो तरुण संतप्त झाले. बार्शी पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या आक्रमक भूमिकेनंतर बार्शी शहरातील अनध़िकृत मशिदींवरील भोंगे हटवण्यात आले. दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता कमिटीची बैठक़ घेतली. भोंगे हटवणे ही तात्पुरती मलमपट्टी आहे, परंतु शहरात अनधिकृत प्रार्थनास्थळांवरील कारवाईचे काय? यासंदर्भात विहिंपने प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.
बारंगुळे प्लॉट भागात मुस्लिम बहुल वस्ती वाढली, तशी येथील हिंदू कुटुंबियांना घरे सोडावी लागली. आणि आता शिवजयंतीला याचे परिणाम दिसून आले. जातीय तणाव,दंगल घडल्यानंतरच पोलीस प्रशासनाला जाग येतेय का? असा बार्शीकरांचा सवाल आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री गहिनीनाथ (बापू) कदम आणि बजरंग दलाचे संयोजक अमर शुक्ला यांनी बार्शी नगर पालिकेचे लक्ष वेधून घेत अनधिकृत प्रार्थना स्थळांच्या उभारणीबाबत आणि त्यावरील भोंगे हटवण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडेही केली होती. वास्तविक या पत्राची दखल घेऊन अनध़िकृत प्रार्थना स्थळे व भोंगे हटवले असते तर शिवजयंतीदिनी जातीय शक्तींचा उपद्रव झाला नसता.
शिवजयंतीची घटना ही सुरवात आहे, या महिन्यात हिंदू नववर्ष गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती तसेच रमजान ईद असे मोठे धार्मिक सण आहेत.या पार्श्वभूमीवर विहिंपने लक्ष वेधून घेतले. तसेच आक्रमक भूमिका घेतल्यानंतर 22 अनधिकृत भोंगे हटवण्यात आले, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली.
शहरात अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या बांधकामा बाबत न.प.चे मुख्याधिक़ारी तैमूर मुलाणी गप्प का आहेत?20/7/2023 आणि 25/9/2024 रोजी विहिंपने भोंगे हटवण्याबाबत निवेदन दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना पोलीस प्रशासन नरमाई भूमिका घेते. परिणामी बारंगुळे प्लॉट येथील जातीय तणावाच्या घटना घडतात, ही वस्तुस्थिती आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता कमिटीची बैठक़ घेऊन भोंगे हटवण्याचे निर्देश दिले. याबरोबरच न.प.ने अनधिकृत प्रार्थना स्थळांवरही कारवाई करावी. याकडे सोयीस्कर डोळेझाक झाली तर बार्शी शहर तसेच ग्रामीण भागातही अशा घटना संभवतात.
राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री फडणवीसांकडे आहे. त्यांचे काही स्थानिक समर्थकांनी दबावाचे राजकारण न आणता कारवाईसाठी न.प. व पोलीस प्रशासनाकडे आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. तरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील.
What's Your Reaction?