भाजपाच्या त्या नगरसेवकांच्या कारवाईकडे लक्ष

द. सोलापुरात 'अर्थपूर्ण' उमेदवारीस पाठिंबा * ही तर "लाखाची गोष्ट", बीआरएसच्या नगरसेवकांशीही संपर्क?

Sep 24, 2024 - 08:21
 0  528
भाजपाच्या त्या नगरसेवकांच्या  कारवाईकडे लक्ष

सोलापूर: दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी ६ नगरसेवकांचा पाठिंबा घेतला आणि उमेदवारीसाठी मागणी अर्ज पक्षाध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे सादर केला, या प्रकरणी भाजपच्या सहा माजी नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून खुलासा देण्याची मुदत संपली आहे. त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी तेलंगणास्थित बीआरएसच्या नेते मंडळींशी ही संपर्क साधला, अशी माहिती आहे. पण त्यांनी श्री.वैैद्य यांना दाद दिली की नाही? पण या प्रकारामुळे "लाखाची गोष्ट" या गाजलेल्या चित्रपटाची आठवण होत आहे.

 श्री.वैद्य यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले की त्यांनी भाजपात प्रवेश केला, याविषयी दक्षिण सोलापुरात चर्चा आहे. यामध्ये भर पडली बीआरएसच्या पाठींबा मागण्याविषयीची. उमेदवारी मागणी अर्ज भाजपाकडे, आणि संपर्क बीआरएसचा! हा काय प्रकार आहे. म्हणजे वैद्य भाजपा आणि बीआरएस यांच्या ही संपर्कात आहेत की काय अशी चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपचे काही माजी नगरसेवकांनी बीआरएसमध्ये 

प्रवेश केला. यापैकी काहीजण विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. आणि इकडे मनपा माजी सभागृह नेत्यासह सहा भाजपा नगरसेवकांनी पाठिंब्याचे पत्र श्री. वैद्य यांना सुपूर्द केले आहे. आणि बीआरएससी संपर्क यामुळे 'अर्थपूर्ण' उमेदवारीची चर्चा शहरातही आहे. 

 भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, (राजश्री)अनिल चव्हाण, (वरलक्ष्मी) श्रीनिवास पुरुड, (राजश्री) अशोक बिराजदार यांनी वैद्य यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत पक्षाध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या नगरसेवकांना नोटीस बजावली असून, त्याची मुदत संपली आहे. संबंधितांचे खुलासे प्राप्त झाल्याची माहिती कार्यालयीन सचिव श्री कंदलगी यांनी दिली. आता पुढे काय याची प्रतीक्षा आहे. 

१९५२ मध्ये गाजलेला मराठी चित्रपट "लाखाची गोष्ट" या विनोदी (राजा परांजपे, राजा गोसावी आणि शरद तळवलकर) चित्रपटाची आठवण यानिमित्ताने होत असून निवडणुकीपूर्वीच लोकांची करमणूक होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow