महिला बँक मॅनेजरवर ५० वार, गळा चिरून निर्घृण हत्या
प्रेमविवाह केलेला अधिकारी पतीच मारेकरी, स्वत: पोलीस ठाण्यात हजर
सोलापूर : प्रेम विवाहानंतर मनी संशय बळावला. आणि भररस्त्यावर आणि भरदिवसा एका महिला बँक़ अधिकारीवर ५० वेळा चाकूने वार केला. आणि गळा चिरून निर्घृण हत्येचा खळबळजनक प्रकार सोमवारी सकाळी घडला. याप्रकरणी अधिकारी पतीवर गुन्हा दाखल झाला असून या घटनेनंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
बार्शी/परंडा रस्त्यावर सोमवारी सकाळी ऋषिकेश पाटील याने पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाली अशी प्राथमिक आहे. प्रत्यक्षदर्शीनी हा प्रकार सुरू असताना पत्नीला पतीच्या तावडीतून सोडवायचा प्रयत्न केला. पण त्यांनाही निर्दयी पतीने जुमानले नाही. प्रेमविवाह केलेले ऋषिकेश पाटील आणि धनश्री दोघेही उच्च पदावर आहेत. दोघांनी अनेक महिने सुखाने संसार केला, मात्र पतीला चारित्र्याचा संशय बळावला. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले, असे समजते. प्रकरण इतके टोकाला गेले की पत्नीचा गळा चिरताना त्याला कसलीही दयामाया आली नाही. बार्शी/परंडा मार्गावर ही घटना घडत होती, तेव्हा रस्त्यावरून येजा करणार्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला, काहीजण घाबरून पळून गेले. पण निर्दयी पती जीव जाईपर्यंत पत्नी धनश्रीवर सपासप वार करत होता.
प्रेम विवाह झालेल्या पती पत्नीत किरकोळ वाद होता, त्यावरून दोघांत दोन दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. सोमवारी सकाळी धनश्री बँकेत जात असताना या वादाचे पर्यवसान पती ऋषिकेश पाटीलने पत्नी धनश्री पाटील हीची हत्या करून शेवट केला. चारित्र्याचा संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भर रस्त्यात, पत्नीची अशी निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
What's Your Reaction?