नीट घोटाळा; पेपर सेट करणार्‍यांनीच फोडला।

प्रा.मनीषा मांढरे नीटच्या गोपनीय कामासाठी तज्ञ नियुक्त, विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्‍न आणि प्रश्‍नपत्रिका सेम टु सेम। नीट परीक्षा कधीच नीट होत नाही, नीटला पेपर फुटीचा शाप!

May 18, 2026 - 08:22
 0  3
नीट घोटाळा; पेपर सेट करणार्‍यांनीच फोडला।

(विजयकुमार पिसे)

नीट परीक्षा कधीच नीट होत नाही, नीटला पेपर फुटीचा जणू शाप आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे गुरूजन,प्राध्यापकांमुळे नीट परीक्षा शेम शेम झाली आहे.

  पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज प्रशासनाने मास्टर माईंड प्रा.मनीषा मांढरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. एनटीएफने नीट परीक्षेच्या गोपनीय कामासाठी त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, त्याच पेपर फुटीच्या मास्टर ठरल्या आहेत.

   प्रा.मांढरे यांनी गोपनीयतेचा भंग करत ब्युटीशियन मनीषा वाघमारेच्या मदतीने घरातच शिकवणी वर्ग घेत विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्‍न लिहून दिले, जे 3 मे रोजीच्या प्रत्यक्ष परीक्षेत सेम टू सेम होते. मनीषा मांढरे या नीट परीक्षा प्रक्रियेत सहभागी होत्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांना तज्ज्ञ नेमले होते. त्यांना वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांची माहिती होती. एप्रिल 2026मध्ये आरोपी वाघमारे हिच्या माध्यमातून नीटच्या संभाव्य उमेदवारांना गोळा करून त्यांच्या पुण्यातील घरात विशेष शिकवणी वर्ग घेतला. पेपर फुटीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सीबीआयने प्रा.मनीषा मांढरे यांना अटक केली. याशिवाय या कटात प्रा.पी.व्ही.कुलकर्णी आणि त्यांचे अन्य सहकारी यांनाही आता अटक केली आहे.

दिल्ली सीबीआयच्या मुख्यालयात चौकशी केल्यानंतर प्रा.मांढरेंना अटक करण्यात आली, असे सीबीआयने सांगितले. 

  प्रा.मांढरे यांना वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या दोन्ही विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचा संपूर्ण अ‍ॅक्सेस होता. याचा फायदा घेत पुण्याच्या ब्युटीशियन मनीषा वाघमारे यांच्या मदतीने नीटच्या संभाव्य उमेदवारांना एकत्र केले आणि पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष शिकवणी वर्ग घेतले, अशी प्राथमिक माहिती आहे.

     

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow