पवन कल्याणच्या रेकॉर्ड ब्रेक रॅलीने देशमुख मालक, देवेंद्र दादा, सुभाष बापू यांचे कल्याण

पवन कल्याणच्या रेकॉर्ड ब्रेक रॅलीने देशमुख मालक, देवेंद्र दादा, सुभाष बापू यांचे कल्याण

Nov 22, 2025 - 23:40
 0  272
पवन कल्याणच्या रेकॉर्ड ब्रेक रॅलीने देशमुख मालक, देवेंद्र दादा, सुभाष बापू यांचे कल्याण
पवन कल्याणच्या रेकॉर्ड ब्रेक रॅलीने देशमुख मालक, देवेंद्र दादा, सुभाष बापू यांचे कल्याण

 (विजयकुमार पिसे)
सोलापूर : तेलुगू सुपर पॉवर स्टार पवन कल्याणचा रोड शो हायव्होल्टेज सुपर पॉवर ठरला. भाजपा उमेदवार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे आणि सुभाषबापू देशमुख यांच्या प्रचारार्थ आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या दर्शनाने पब्लीक आणि चाहते बेहद्द खूष झाले. त्यामुळे ह्या तीनही उमेदवारांचे "कल्याण" झाले.  
   पवन कल्याण येणार म्हणून सोलापूरकरांना वेध लागले होते. दुपारी तीन पासूनच जुने विडी घरकुल परिसरात सर्व रस्त्यांवर ओव्हरफुल्ल गर्दी होती. सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी सायंकाळी रोड शो होता. दुपारपासून रस्त्यावर लोटलेल्या गर्दीला पवन कल्याणचे दर्शन रात्री 8 वाजता घडले. सुपर पॉवर स्टार पवन कल्याण यांना पाहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळली. 
   आंध्र प्रदेशातील जनसेना पक्षाचे संस्थापक तथा उपमुख्यमंत्री यांच्या रोड शो साठी त्यांच्या चाहत्यांना तब्बल चार तास प्रतीक्षा करावी लागली. जुना विडी घरकुल येथील आदिशक्ती चौक़, संभाजीराव शिंदे प्रशाला, पिंडीपोल हॉस्पीटल, लक्ष्मी चौक, सागर चौक, वसुंधरा सोसायटी, गोंधळी वस्ती, 256 गाळा, शांती चौक़, मार्कंडेय रुग्णालय, दाजी पेठ, दत्तनगर, स्वा. सावरकर पुतळा, वालचंद कॉलेज, सत्तर फूट रोड, माधव नगर आणि नीलम नगर  या मार्गावर रोड शो होता. रात्रीपर्यंत आपल्या भागात पवन कल्याणचे रोड शो होणार नाहीत, हा अंदाज घेवून त्यांच्या चाहत्यांनी शहरातील मध्यवर्ती भागात मोठी गर्दी केली. जेसीबीने फुले उधळून लाडक्या सुपर पॉवर स्टार हिरोचे स्वागत दणदणीत केले. मोबाईरूमध्ये आपल्या चाहत्याची छबी टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल ऑन होते. 23 तारखेच्या निवडणूक़ निकालाआधीचा ट्रेलर या रोड शो ने दाख़वला.


*शहर मध्य मतदारसंघात स्वागत....
  रात्री नऊच्या सुमारास शहर मध्य मतदार संघात अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन झाले. उघड्या जीपमध्ये उभे राहिलेले अभिनेते पवन कल्याण आणि भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जेसीबीने फुले उधळून स्वागत केले. जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना मतदान करून देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, जय मार्कंडेया अशा घोषणांनी रस्ते दुमदुमून गेले होते.    *भाजपाचे उमेदवार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष बापू देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन करीत हातात कमळ असलेले चित्र झळक़ावत कमळाला मतदान करा, असे पवन कल्याण यांनी त्यांच्या चाहत्यांना आवर्जून सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow