भाजपाचे सोलापुरात पंचपरिवर्तन! लक्ष्यवेध न्यूजचे परफेक्ट नॅरेटिव्ह

सुभाषबापू, देशमुख मालक,कल्याणशेट्टी,आवताडे आणि कोठे ठरले पाच पांडव, विरोधकांचे संपले डाव, दैदीप्यमान विजयाची आज वर्षपूर्ती.

Nov 23, 2025 - 00:25
Nov 23, 2025 - 00:30
 0  242
भाजपाचे सोलापुरात पंचपरिवर्तन! लक्ष्यवेध न्यूजचे परफेक्ट नॅरेटिव्ह
भाजपाचे सोलापुरात पंचपरिवर्तन! लक्ष्यवेध न्यूजचे परफेक्ट नॅरेटिव्ह

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : अपेक्षेप्रमाणे भाजपाने सोलापूर शहर मध्य मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून *मोका दिला, त्या संधीचे मतदारांनी सोने केले. परिणामी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे पाचही उमेदवारांनी पंचपरिवर्तन केले.
   सोलापूर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट,मंगळवेढा आणि सोलापूर मध्य या पाचही मतदारसंघात कमळ फुलले. महायुतीने *पंच मारला. विधानसभा निवडणूक रणनीतीविषयी 'लक्ष्यवेध' न्यूजने जो नॅरेटिव्ह उभा केला, तो शत प्रतिशत यशस्वी ठरला. त्यामुळे 'लक्ष्यवेध'चा नॅरेटिव्ह भाजपाच्या विजयात निर्णायक ठरला.
   महायुतीच्या तिकीट वाटपात सोलापूर शहर मध्य मतदारसंघ भाजपाला मिळवणे/मिळणे ही आग्रही भूमिका 'लक्ष्यवेध'ने प्रारंभीपासूनच मांडली होती. पक्षाला देखील ही भूमिका पटली. आणि 'लक्ष्यवेध'चा नॅरेटिव्ह परफेक्ट झाला.   
   भाजपाने नवा युवा चेहरा म्हणूून देवेंद्र कोठे यांना लॉन्च केले. शहर मध्य मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदार संघातील अन्य विधानसभा मतदारसंघासाठी सुवर्ण-मध्य ठरला. त्यामुळे शहर उत्तर विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूर सुभाषबापू देशमुख, अक्कलकोटमधून जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी तसेच मंगळवेढा/पंढरपूरचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आणि युवा उमेदवार देवेंद्र कोठे यांनी पंच परिवर्तन घडवले.


  लोकसभेपाठोपाठ सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सारे काही पॅचअप करून जागावाटपाचे सुनियोजन केले. त्यामुळे कमी अधिक़ प्रमाणात असलेली नाराजी लवकरच संपली. याउलट आघाडीत बिघाडी कायमच राहिली. काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याच उमेदवारांचा आणि घटक पक्षांचा विश्‍वासघात केला. त्यामुळे शहर मध्य मतदारसंघात आडम मास्तर यांनी काँग्रेस महाआघाडी विरोधात बंडाचे लाल निशाण फडकवले. दक्षिण सोलापुरात सांगली पॅटर्नवर सोलापुरी पॅटर्न भारी ठरला. ठाकरेंची  सेना एकाकी लढली, आणि पडलीही. परिणामी महाआघाडीला दोन मतदारसंघात ठाकरे सेनेच्या मशालीने आग लावली. शिंदे-पवार प्रेमी काडादी यांनी आघाडीलाच 'धर्मसंकटा'त टाकले. (सप्टेंबरच्या लक्ष्यवेधमध्ये काडादींमुळे धर्मसंकटात कोण? हा नॅरेटिव्ह मांडला होता.) तसेच ठाकरे सेनेच्या कडव्या शिवसैनिकांनी शहर उत्तरमध्ये तुतारी पिपाणी केली. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना,अपक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस अशा चार पक्षांमधून फिरून आलेले माजी महापौर महेश कोठे सलग चौथ्यांदा पराभूत झाले. अक्कलकोट मतदारसंघात सारे काही आलबेल होते. तिथे अप्पांनी उघडपणेच केले होते.  शहर उत्तरमध्येही त्यांनी चिमणीला साह्य करून भाजपाला सरळ सरळ आव्हान दिले. खंजीर खुपसण्याची श.प.राष्ट्रवादीची परंपरा यावेळीही कायम राहिली. परंतु फरक काहीच पडला नाही.
विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी (20 नोव्हेंबर 2024) सुशीलकुमार आणि खा. प्रणितीताई शिंदे यांनी दक्षिण सोलापुरात उघड उघड आपला धर्म सांगून अधर्म कसा पाळावा याचे (आदर्श!) उदाहरण घालून दिले. पितापुत्रींच्या या खेळीमुळे सोलापूर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे काँग्रेसचे बालेकिल्ले धोक्यात आले. हाताचा पंजा घालवण्याची नामुष्की ताई काँग्रेसच्या विद्यमान खासदार असताना सहा महिन्यातच ओढवली, त्यांचा हक्काच्या शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती ताईंनी हॅटट्रिक केली होती. त्याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणूकपूर्व आणि निवडणूक प्रचार काळात 'लक्ष्यवेध' न्यूजने जो नॅरेटिव्ह उभा केला होता, त्याचा सक्सेस रेट शत प्रतिशत ठरला.
   भाजपाचे सोलापुरात पंचपरिवर्तन झालेच.  सुभाषबापू देशमुखांची हॅटट्रिक उच्चांकी ठरली.  विजयकुमार देशमुख मालकांनी परंपरागत विरोधकाला *पंच मारला. शिवाय मताधिक्क्यही व़ाढवले. सचिन कल्याणशेट्टी यांनी सलग दुसर्‍यांदा सिध्दाराम म्हेत्रे यांच्या आव्हानाचा पाचोळा केला. मंगळवेढ्यात समाधान आवताडे धोक्यात होते. तिथे विरोधकांची फाटाफूट निर्णायक ठरली. शहर मध्यचे देवेंंद्र कोठे पाच पांडवात शेवटचे घटक. नवा चेहरा. ते 'जायंट किलर' ठरले.
*सुभाषबापू, देशमुख मालक,कल्याणशेट्टी,आवताडे आणि कोठे पाच पांडव,ज्यामुळे 
विरोधकांचे संपले डाव, त्या दैदीप्यमान विजयाची आज (23 नोव्हेंबर) वर्षपूर्ती. लक्ष्यवेध न्यूजतर्फे पंचपरिवर्तनातील पांडवांना लक्ष लक्ष शुभेच्छा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow