फडणवीसांची विजय संकल्प सभा! भाजपा महायुती, महाशक्ती!!
लाडक्या बहिणींच्या देवाभाऊन्कडे विकासाचे व्हिजन, काँग्रेस/मविआचा जोरच नाही, शिंदे,पवारांचे वस्त्रहरण?
(विजयकुमार पिसे)
राज्यात भाजपा महायुतीत महाशक्ती असून शिंदे सेना आणि अजीतदादांनी उभे केलेले आव्हान पाहता यावर देवाभाऊन्चा उतारा असून फडणवीसांच्या विजय संकल्प सभेची उत्सुकता आहे. शिवाय त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. दुपारी ह.दे. प्रशालेच्या मैदानावर भाजपा विजयाची संकल्प सिध्दी शतप्रतिशत अनुभूती पाहायला मिळणार आहे.
भाजपा केंद्रात व राज्यात मोठा भाऊ ही वस्तुस्थिती असताना नगर पालिका निवडणुकीपासून शिंदे सेना आणि अजीतदादांच्या गटाने भाजपावर आक्रमक चढाई सुरू केली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपासमोर आव्हान महाविकास आघाडीचे मुळीच नाही. काँग्रेसचे देखील नाही. कारण काँग्रेसच्या टीकेची धार बोथट (संदर्भ : सुजात आंबेडकर) झाली आहे. या उलट शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांनी भाजपा इच्छुक उमेदवारांना भाजपा विरोधातच तिकीट देउन मैदानात उतरविले आहे. न.प.मध्ये मिळालेल्या यशाने दोन उपमुख्यमंत्री (दादा/भाई) सैरभैर झाले आहेत. त्यावर उतारा म्हणून देवेंद्र फडणवीस शिंदे आणि पवारांचे वस्त्रहरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिंदे सेना आणि अजीतदादा गटाने बंडखोरांना रसद पुरवली आहे. यामुळे भाजपा उमेदवारांना धोका होऊ नये म्हणून भाजपा नेते देखील सावध झाले आहेत.
भाजपा नेत्यांनी आत्मविश्वासाने 75 पार चा नारा दिला आहे, तो तडीस नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची विजय संकल्प सभा आहे. फडणवीस सोलापूरच्या विकासाचे व्हिजन घेउन तो संकल्प शतप्रतिशत सिध्दीस नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दौरा रद्द झाला. यामुळे शिंदे सेनेचे अवसान गळाले आहे.
राज्यात अन्य प्रमुख महापालिकांमध्ये विशेषत: पुणे,पिंपरी,नाशिक,नागपूर पाठोपाठ सोलापूर येथे शिंदे आणि अजीतदादांनी भाजपालाच लक्ष्य केले आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी आणि काँग्रेस व ठाकरे सेना घायाळ झाली आहे. त्यांचे अवसान गळाले आहे. ठराविक प्रभागांमध्ये त्यांचे चार उमेदवारांचे पॅनल आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी अध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रचार सभांमध्येही मविआवर, काँग्रेसवर टीकाटिपणी ऐवजी ठाकरे बंधू आणि शिंदे व पवार यांना लक्ष केले जाते. तर फडणवीस आक्रमक झाले असून या सभेत शिंदे,पवार यांचे वस्त्रहरण करून त्यांच्या उमेदवारांचे डॅॅमेज कंट्रोल करण्यासाठी फडणवीसांची सभा कारणीभूत लागेल, असे मानले जाते. आज शनिवारच्या सभेनंतर खर्या अर्थाने भाजपाचा प्रचार आणखी आक्रमक होईल, असा एकंदर रागरंग आहे. यासाठी भाजपा सर्वशक्तिनिशी मैदानात उतरलेला आहे.
What's Your Reaction?